पाण्याअभावी जिमलगट्टा परिसरातील धानपीक करपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2017 11:35 PM2017-10-05T23:35:08+5:302017-10-05T23:35:19+5:30

पाण्याअभावी जिमलगट्टा परिसरातील धानपीक करपायला लागले आहे. त्यामुळे या परिसरातील शेतकरी चिंतेत पडला आहे.

Without water, the paddy crop in the gymkhata area was curtailed | पाण्याअभावी जिमलगट्टा परिसरातील धानपीक करपले

पाण्याअभावी जिमलगट्टा परिसरातील धानपीक करपले

Next
ठळक मुद्देशेतकरी चिंतेत : महिनाभरापासून पावसाची दडी

लोकमत न्यूज नेटवर्क
जिमलगट्टा : पाण्याअभावी जिमलगट्टा परिसरातील धानपीक करपायला लागले आहे. त्यामुळे या परिसरातील शेतकरी चिंतेत पडला आहे.
जिमलगट्टा परिसरात मागील महिनाभरापासून पावसाने दडी मारली आहे. या परिसरातील शेतकºयांकडे सिंचनाच्या सुविधा उपलब्ध नाही. पावसाच्या पाण्याच्या भरवशावरच धानपीक अवलंबून आहे. सुरुवातीलाही कमी पाऊस झाला. त्यामुळे शेतकºयांची रोवणी लांबली. पोळ्याच्या जवळपास पाऊस झाल्यानंतर शेतकºयांनी धानाची रोवणी केली. धानपीक आता गर्भात आहे. अशातच आता पावसाने दडी मारली. त्यामुळे धानपीक करपायला लागले आहे. ज्या शेतकºयांचे शेत नाल्याजवळ आहेत, त्यांनी डिझेल इंजिनच्या सहाय्याने पाणी देण्यास सुरुवात केली आहे. मात्र ज्या शेतकºयांकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध नाही, अशा शेतकºयांना मात्र हातात आलेले पीक करपताना पाहण्यावाचून कोणताही पर्याय शिल्लक राहिलेला नाही. लाखो रूपये खर्चुन रोवलेले धानपीक करपत असल्याने शेतकºयांवर कर्जाचे बोजे आणखी वाढणार आहे. शासनाने जिमलगट्टा परिसरात सिंचनाच्या सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी परिसरातील शेतकºयांकडून होत आहे. शेताचे पंचनामे करून मदतीची मागणी होत आहे.

Web Title: Without water, the paddy crop in the gymkhata area was curtailed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.