बिबट्याच्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2021 05:00 AM2021-09-30T05:00:00+5:302021-09-30T05:00:33+5:30

सदर महिला घरामागे भांडी घासत असताना जवळच दबा धरून बसलेल्या बिबट्याने तिच्यावर हल्ला केला. आरडाओरड केल्यानंतर तिच्या मुलाने व शेजारच्या युवकांनी तिकडे धाव घेतली आणि महिलेला बिबट्याच्या तावडीतून सोडवत त्याला परतवून लावले. यामध्ये महिलेच्या गळ्यावर गंभीर जखमा झाल्या आहे. नशीब बलवत्तर म्हणून तिचे प्राण वाचले, अशी प्रतिक्रिया प्रत्यक्षदर्शींनी व्यक्त केली.

Woman seriously injured in leopard attack | बिबट्याच्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी

बिबट्याच्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क
आष्टी : चामोर्शी तालुक्यातील आष्टी-इल्लूर येथील पेपर मिल कॉलनीत बुधवारी सकाळी एका बिबट्याने महिलेवर हल्ला केल्याने ती गंभीर जखमी झाली. ही घटना सकाळी ८ वाजताच्या सुमारास घडली. बबिता दिलीप मंडल (४५ वर्षे) असे जखमी महिलेचे नाव आहे.
सदर महिला घरामागे भांडी घासत असताना जवळच दबा धरून बसलेल्या बिबट्याने तिच्यावर हल्ला केला. आरडाओरड केल्यानंतर तिच्या मुलाने व शेजारच्या युवकांनी तिकडे धाव घेतली आणि महिलेला बिबट्याच्या तावडीतून सोडवत त्याला परतवून लावले. यामध्ये महिलेच्या गळ्यावर गंभीर जखमा झाल्या आहे. नशीब बलवत्तर म्हणून तिचे प्राण वाचले, अशी प्रतिक्रिया प्रत्यक्षदर्शींनी व्यक्त केली.
सदर महिलेवर आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे हलविण्यात आले आहे. दरम्यान आलापल्लीच्या दौऱ्यावर असलेले वन वनसंरक्षक डॉ. किशोर मानकर यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. पेपर मिल कॉलनीच्या मागे मोठ्या प्रमाणात सुबाभूळाची झाडे वाढली आहेत. त्यात बिबट्याला लपायला जागा मिळत आहे. त्यामुळे ती झाडे विरळ करण्याच्या सूचना त्यांनी नागरिकांना दिल्या. 
बिबट्याला पकडण्याची परवानगी
या अगोदरही बिबट्याने पेपरमिल कॉलनीत एका ६ वर्षीय मुलावर   हल्ला करून जखमी केले होते. मार्कंडा (कं) जंगलात  एका ८ वर्षांच्या मुलाला ठार केले होते. सदर घटनेमुळे बिबट्याची दहशत कायम असून त्या बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी होत आहे. याबाबत मार्कंडाच्या वनपरीक्षेत्र अधिकारी भारती राऊत यांना विचारले असता बिबट्याला पकडण्याची परवानगी मिळाली असून लवकरच पेपरमिलमध्ये पिंजरा लावून बिबट्याला पकडण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Woman seriously injured in leopard attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.