धान चुकाऱ्याच्या रकमेसाठी महिलेची पायपीट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:34 AM2021-05-22T04:34:00+5:302021-05-22T04:34:00+5:30
आरमोरी : फेब्रुवारी महिन्यात मार्केटिंग फेडरेशनला हमीभावाने विकलेल्या धानाचे पैसे मिळाले नाही. सध्या अडचणीच्या काळात बँकेत पैसे जमा झाले ...
आरमोरी : फेब्रुवारी महिन्यात मार्केटिंग फेडरेशनला हमीभावाने विकलेल्या धानाचे पैसे मिळाले नाही. सध्या अडचणीच्या काळात बँकेत पैसे जमा झाले का? याबाबत चाैकशी करण्यासाठी वृद्ध महिला आपल्या नातवासोबत बँकेत येरझारा मारत आहे.
आरमोरीपासून ३ किमी अंतरावर असलेल्या रामाळा येथील मुखरू निंबोळ या शेतकऱ्याने मार्केटिंग फेडरेशनच्या आधारभूत धान खरेदी केंद्रावर २३ फेब्रुवारीला धानाची विक्री केली होती. मात्र तीन महिने उलटूनही त्या शेतकऱ्यांचे पैसे बँकेच्या खात्यावर जमा न झाल्याने आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. मुखरू तिमा निबोंड वय ६५ वर्षे हा शेतकरी डोळ्याने अधूक तर मुलगा हातपायाने अपंग असल्याने त्याची पत्नी मुक्ता रमेश निबोंळ ही तिचा नातू मनीष याच्यासोबत रामाळा ते आरमोरी असा ३ किमीचा पायी प्रवास करून आरमोरी येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेत वारंवार जात आहेत.
बँक कर्मचाऱ्यांकडे चाैकशी केल्यानंतर धानाच्या चुकाऱ्याची रक्कम जमा झाली नाही, असे उत्तर मिळाल्यावर निराश मनाने ते घरी परतत आहेत. दरम्यान या महिलेने खरेदी-विक्री संस्थेच्या कार्यालयात तीन ते चार दिवसांआड जाऊन चाैकशी केली. मात्र तिला समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याचे तिने लाेकमतशी बाेलताना सांगितले.
===Photopath===
190521\31091708img_20210519_163613.jpg
===Caption===
महामंडळाला विकलेल्या धानाच्या पैसे जमा झाले की नाही यासाठी बँकेत नातवासोबत आलेली वृद्ध महिला