व्यवसायातून महिलांनी स्वतःच्या पायावर उभे व्हावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:42 AM2021-09-14T04:42:51+5:302021-09-14T04:42:51+5:30

रविवार, १२ सप्टेंबर रोजी अहेरी तालुक्यातील बोटलाचेरू येथे समूह कुक्कुटपालन केंद्राच्या शुभारंभाप्रसंगी उद्घाटनीय स्थानावरून ते बोलत होते. या वेळी ...

Women in business should stand on their own feet | व्यवसायातून महिलांनी स्वतःच्या पायावर उभे व्हावे

व्यवसायातून महिलांनी स्वतःच्या पायावर उभे व्हावे

Next

रविवार, १२ सप्टेंबर रोजी अहेरी तालुक्यातील बोटलाचेरू येथे समूह कुक्कुटपालन केंद्राच्या शुभारंभाप्रसंगी उद्घाटनीय स्थानावरून ते बोलत होते. या वेळी प्रामुख्याने किष्टापूर ग्रामपंचायतीचे सरपंच नंदू तेलामी, उपसरपंच पवन आत्राम, राकाँच्या महिला तालुकाध्यक्ष सारिका गडपल्लीवार, लक्ष्मण येरावार, मधुकर सडमेक, ग्रा. पं. सदस्य तोटावार, संगीता सडमेक आदी उपस्थित होते.

रोजगाराच्या शोधात आपल्या भागातील महिला, भगिनी यांचे स्थलांतर होऊ नये, आदिवासी भागातील महिलांना स्वतःच्या गाव व घराजवळ रोजगार प्राप्त व्हावा याकरिता महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागाने स्तुत्यप्रिय उपक्रम व पाऊल उचलले असून, ही योजना निश्चितच फलदायी ठरेल, असा आशावाद व्यक्त करून महिलांनी स्वावलंबी बनून स्वतःच्या पायावर सक्षमपणे उभे होऊन स्वतःची उन्नती करावी, असे आवाहन भाग्यश्री आत्राम यांनी केले. या वेळी मनीषा सडमेक, ऊर्मिला सडमेक, मंगला सडमेक, सुरेखा तोरे, जसवंता कुमरे, वनिता मडावी, राधा कोरेत, सुरेश सडमेक, पुनाजी मडावी, पोट्टी तलांडे, विठ्ठल मडावी व ग्रामस्थ उपस्थित होते.

120921\3712img-20210912-wa0229.jpg

ककुकुट पालन केंद्राचे उदघाटन करताना भाग्यश्रीताई आत्राम

Web Title: Women in business should stand on their own feet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.