महिलांनी केला सडवा नष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2019 10:41 PM2019-02-14T22:41:13+5:302019-02-14T22:41:33+5:30
सिरोंचा तालुक्यातील गर्कापेठा येथील मुक्तिपथ गाव संघटनेच्या महिलांनी धाडसत्र राबवून दारूविक्रेत्यांनी लपवून ठेवलेला मोह व दारूचा सडवा नष्ट केला आहे. दारूविक्रेत्यांनी महिलांना जीवे मारण्याची धमकी दिल्यानंतर महिलांनी दारूविक्रेत्यांविरोधात बामणी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बामणी : सिरोंचा तालुक्यातील गर्कापेठा येथील मुक्तिपथ गाव संघटनेच्या महिलांनी धाडसत्र राबवून दारूविक्रेत्यांनी लपवून ठेवलेला मोह व दारूचा सडवा नष्ट केला आहे. दारूविक्रेत्यांनी महिलांना जीवे मारण्याची धमकी दिल्यानंतर महिलांनी दारूविक्रेत्यांविरोधात बामणी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.
गर्कापेठा गावात मोठ्या प्रमाणात मोहफुलाची दारू तयार करून विक्री केली जात होती. गावातील महिलांनी एकत्र येत गावात दारू व खर्राबंदी विक्रीचा ठराव घेतला. मात्र काही दारूविक्रेते महिलांच्या सूचनांचे पालन न करता दारूची विक्री करीत होते. दोन महिन्यांपासून दारूबंदी असताना काही विक्रेते लपूनछपून दारू काढून त्याची विक्री करीत होते. ही बाब महिलांच्या लक्षात आल्यानंतर महिलांनी बुधवारी तीन घरी धाड टाकली, दोन घरी मोहफूल व गुळाचा सडवा आढळला. दारूच्या काही बाटलाही सापडल्या. महिलांनी सडवा नष्ट केला असता, दारूविक्रेत्याने महिलांना अश्लिल भाषेत शिविगाळ केली. तसेच जीवे मारण्याची धमकीसुद्धा दिली. याबाबत संघटनेच्या महिलांनी बामणी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. दारूविक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन देण्यात आले.