महात्मा गांधी महाविद्यालयात महिला सक्षमीकरण कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:36 AM2021-04-27T04:36:56+5:302021-04-27T04:36:56+5:30
कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डाॅ. लालसिंग खालसा हाेते. यावेळी ‘पोरी जरा जपून’च्या कार्यकर्त्या, माय मराठी समूहाच्या अध्यक्षा कवयित्री प्रा. विजय ...
कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डाॅ. लालसिंग खालसा हाेते. यावेळी ‘पोरी जरा जपून’च्या कार्यकर्त्या, माय मराठी समूहाच्या अध्यक्षा कवयित्री प्रा. विजय मारोतकर, महिला राज आणि महिला सक्षमीकरण समितीच्या पदाधिकारी प्रा. सुनंदा कुमरे, प्रा. सीमा नागदेवे व प्रा. स्नेहा मोहुर्ले सहभागी झाले. बालिकेपासून तरुणीपर्यंत व कार्यालयीन महिला अधिकाऱ्यांपासून ते वृद्ध महिलापर्यंत स्त्रियांना पुरुषांच्या शोषणाला बळी पडावे लागते. तेव्हा सावित्रीच्या लेकींनी दामिनी, भरोसा, निर्भया सेल किंवा १०९१ व १०९८ या क्रमांकाचे सहकार्य घ्यावे. अनेक स्तरातील, लहान मुली, विद्यार्थिनी आणि गृहिणी शाेषणाला बळी पडत आहेत. शालेय, महाविद्यालयीन आणि तारुण्यात पदार्पण करणाऱ्या कोवळ्या मुलींचे शोषण त्यांना प्रेमाच्या जाळ्यात फसवून केले जाते. अशावेळी अनोळखी व अपरिचित व्यक्तीच्या स्तुतीला किंवा मोबाईल मेसेजना प्रतिसाद न देता अतिशय सावधगिरी बाळगली पाहिजे. मोबाईल हे आजच्या परिस्थितीत संपर्काचे उत्कृष्ट साधन असले तरी त्याच मोबाईलचा गैरवापर करून महिलांना विविध प्रकारच्या मोहजाळात अडकविले जाते. पालकांनीसुद्धा बेसावध राहून चालणार नाही, असे प्रतिपादन प्रा. विजया मारोतकर यांनी केले. प्राचार्य डॉ. लालसिंग खालसा यांनी महाविद्यालयाने महिला राज आणि महिला सक्षमीकरणाच्याद्वारे महिला जागृतीचे, महिला स्वावलंबनाचे आणि कायदेविषयक मार्गदर्शन करणारे अनेक कार्यक्रम आतापर्यंत राबविले, असे प्रतिपादन केले. याचवेळी ॲड. नर्गिस पठाण, दीपांजली गावीत आणि डॉ. पोर्णिमा चहांदे यांनीही मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सुनंदा कुमरे, पाहुण्यांचा परिचय प्रा. सीमा नागदेवे, तर प्रा. स्नेहा मोहुर्ले यांनी आभार मानले. तंत्रसहाय प्रा. सुनील चुटे, प्रशांत दडमल यांनी केले. यशस्वीतेसाठी किशोर कुथे, सचिन ठाकरे यांनी सहकार्य केले.