महिलांनी उभी केली आर्थिक ताकद

By admin | Published: October 20, 2015 01:40 AM2015-10-20T01:40:31+5:302015-10-20T01:40:31+5:30

विधवा, गरीब, घटस्फोटित महिलांनी एकत्र येऊन एक आर्थिक शक्ती निर्माण करण्याचे सामर्थ्य निर्माण केला आहे, ते वैष्णोदेवी

Women have built economic strength | महिलांनी उभी केली आर्थिक ताकद

महिलांनी उभी केली आर्थिक ताकद

Next

विधवा, गरीब, घटस्फोटित महिलांनी एकत्र येऊन एक आर्थिक शक्ती निर्माण करण्याचे सामर्थ्य निर्माण केला आहे, ते वैष्णोदेवी महिला बचत गट आरमोरीने. २००४ मध्ये सुरू झालेल्या या बचत गटाचे काम रोपट्याच्या रूपाने सुरू होऊन वटवृक्षात रूपांतरित झाले आहे. ज्या महिलांना कधीकाळी आर्थिक संकटांचा सामना करावा लागत होता. त्यामुळे त्यांच्यासमोर अनेक अडचणी येत होत्या. त्यावर मात करीत आता या बचतगटाने यशाची नवी दारे आपल्यासाठीच उघडली आहेत. यातून त्यांनी मोठी भरारी घेतली असून हा बचत गट आता इतरांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे.
२ सप्टेंबर २००४ रोजी आशा विजय बोडणे यांच्या पुढाकाराने वैष्णोदेवी महिला बचत गटाची स्थापना झाली. बोडणे या घटस्फोटित महिला होत्या. आर्थिक अडचण त्यांना नेहमीच प्रगतीसाठी अडचणीची ठरत होती. यावर मात करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. त्या एका मुलीसोबत माहेरी राहायला आल्यावर वडिलांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने त्यांच्याकडेही त्या पैशासाठी हात पसरू शकत नव्हत्या. अशावेळी त्यांनी घराशेजारी राहणाऱ्या विधवा, गरीब महिलांना एकत्र आणून १५ महिलांची मोट बांधली व यांच्या माध्यमातून एका बचतगटाची निर्मिती केली. सुरूवातीला बँकेकडून बचत गटासाठी पाच हजार रूपयांचे कर्ज उचलले. तीन एकर शेती केली व बँकेच्या पैशाची परतफेड करून उरलेल्या रकमेत बस स्टँडच्या बाजूला झुणका-भाकर व भाजी-पुरीचा व्यवसाय सुरू केला. काही महिला जिल्हा परिषद शाळेत स्वयंपाकाचे काम करू लागल्या. याच काळात एका महिलेचा पती आजारी पडला. महिला बचत गटाच्या सर्व महिलांनी एकत्र मिळून त्या महिलेसाठी आर्थिक सहाय्य उभे केले. बचत गटा व्यतिरिक्तही शोषित, पीडित, विधवा महिलांसाठी अर्थसहाय्य देण्याचे काम त्यांनी सुरू केले. एका महिलेला केळी विकण्याचा व्यवसाय टाकण्यासाठी आर्थिक पाठबळ या बचत गटाने दिले. आरमोरी शहरात स्थापन झालेला हा महिलांचा पहिला बचत गट होता. याचा आदर्श घेत कालांतराने अनेक बचत गट निर्माण होत गेले. परंतु महिलांसाठी आर्थिक प्रगतीचे पहिले पाऊल टाकण्याचे काम आशा बोडणे यांच्या नेतृत्वातील वैष्णोदेवी महिला बचत गटाने केले. या बचत गटाच्या यशाची भरारी सर्वदूर पसरल्यावर शासनाने त्यांच्याकडे रेशन दुकान व केरोसीनचा परवाना दिला. त्या माध्यमातून २०११ मध्ये रॉकेल व्यवसाय या बचत गटाने सुरू केला.
१५ महिला आज यामध्ये काम करीत आहेत. यात अध्यक्ष म्हणून प्रतिभा नानाजी कोल्हे, सचिव आशा बोडणे, उषा तिजारे, मीरा खोब्रागडे, वेणू राजगिरे, कमल जवजांलकर, विमल मेश्राम, जिजा कोल्हे, प्रेमिला कोल्हे, प्रेमिला तिजारे, भारती चिलबुले, लता कोल्हे, सुशीला कोल्हे, ज्योती घाटुरकर, सिंधू सोरते यांचा समावेश आहे. यात एक घटस्फोटित महिला असून सात विधवा महिलांना घेऊन १५ महिलांची ही नारीशक्ती त्यांच्याच जीवनातला आर्थिक अंधार दूर करण्यासाठी पणतीच्या भूमिकेतून काम करीत आहेत.

Web Title: Women have built economic strength

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.