आगरोधक प्रणालीच्या सुविधेत महिला रुग्णालयाची इमारत नापास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2018 12:07 AM2018-01-05T00:07:51+5:302018-01-05T00:08:00+5:30

तब्बल ७२६३ वर्ग मीटर एवढे बांधकाम असणाऱ्यां इंदिरा गांधी चौकातील तीन मजली शासकीय महिला रुग्णालयाच्या उद्घाटनामागील शुक्लकाष्ठ अजूनही संपलेले नाही. या इमारतीसाठी आवश्यक असणारी होजरील पद्धतीची आगरोधक पाणी पुरवठा यंत्रणा तिथे उपलब्ध नाही.

Women Hospital's building will not be available in the facility of Anti-Aging System | आगरोधक प्रणालीच्या सुविधेत महिला रुग्णालयाची इमारत नापास

आगरोधक प्रणालीच्या सुविधेत महिला रुग्णालयाची इमारत नापास

Next
ठळक मुद्देसमस्या संपता संपेना : अग्निशमन यंत्र लावून काम भागविण्याचा प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : तब्बल ७२६३ वर्ग मीटर एवढे बांधकाम असणाऱ्यां इंदिरा गांधी चौकातील तीन मजली शासकीय महिला रुग्णालयाच्या उद्घाटनामागील शुक्लकाष्ठ अजूनही संपलेले नाही. या इमारतीसाठी आवश्यक असणारी होजरील पद्धतीची आगरोधक पाणी पुरवठा यंत्रणा तिथे उपलब्ध नाही. त्यामुळे फायर आॅडिटमध्ये या इमारतीला नापास करण्यात आले आहे.
नगर परिषदेच्या अग्निशमन दलाने काही दिवसांपूर्वीच या इमारतीचे फायर आॅडिट केले. त्यात अग्निशमनच्या पुरेशा सुविधा नसल्याचा ठपका ठेवला आहे. विशेष म्हणजे इमारतीची भव्यता पाहता प्रत्येक मजल्यावर आग विझविण्यासाठी पाण्याची स्वतंत्र पाईपलाईन असणारी होजरील सिस्टीम असणे गरजेचे आहे असे अहवालात म्हटले आहे. त्यामुळे ही यंत्रणा असल्याशिवाय अग्निशमन विभागाकडून या इमारतीला योग्यतेचे प्रमाणपत्र मिळणे कठीण झाले आहे.
विशेष म्हणजे एवढ्या मोठ्या इमारतीत मोजकेच अग्निशमन यंत्र (फायर इस्टिंग्विशर) लावलेले होते. त्यापैकी ७ यंत्रांची मुदतही संपलेली होती. ही बाब न.प.च्या अग्निशमन विभागाने निदर्शनास आणून दिल्यानंतर बांधकाम विभागाने तातडीने प्रत्येक मजल्यावर पुरेसे अग्निशमन यंत्र लावले आहेत. मात्र पाण्याच्या पाईपलाईनचे काम छोटे अग्निशमन यंत्र करू शकेल का, हे सांगणे कठीण झाले आहे.
इमारतीच्या नकाशात दडले काय?
वास्तविक सार्वजनिक वापराच्या अशा मोठ्या इमारतीत आग लागल्यास जीवित हाणी टाळण्यासाठी पाणी पुरवठा करणारी आगरोधक यंत्रणा असणे गरजेचे आहे. असे असताना या भव्य इमारतीची उभारणी करण्यापूर्वी नकाशात ती यंत्रणा होती की नाही? या प्रश्नाचे उत्तर गुलदस्त्यात आहे. जर नकाशात नसेल तर ही चूक तत्कालीन अधिकाºयांच्या लक्षात आली नाही का? असे प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत.
अधिकृत एजन्सीकडून फायर आॅडिट का नाही?
दिवसरात्र रुग्णांचे वास्तव्य राहणाºया रुग्णालयाच्या इमारतीचे फायर आॅडिट अधिकृत एजन्सीकडूनच करणे गरजेचे आहे. असे असताना अग्निशमन अधिकारीच नसलेल्या नगर परिषदेच्या यंत्रणेकडून झालेले फायर आॅडिट कितपत योग्य? असा प्रश्न शंका निर्माण करीत आहे. गडचिरोलीत अधिकृत एजन्सी नसली तरी नागपुरातील एजन्सीकडे हे काम देऊन भविष्यातील दुर्घटनेचा धोका टाळता येऊ शकतो.

Web Title: Women Hospital's building will not be available in the facility of Anti-Aging System

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.