महिलांनी संघटित होण्याची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2017 12:30 AM2017-09-04T00:30:39+5:302017-09-04T00:32:33+5:30
गडचिरोली येथे होत असलेली ३० वी महिला परिषद असून या परिषदेतून महिलांनी सावित्रीबाई फुले, जिजामाता यांचा आदर्श देऊन समता व बंधूत्त्वाच्या मार्गाने चालावे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गडचिरोली येथे होत असलेली ३० वी महिला परिषद असून या परिषदेतून महिलांनी सावित्रीबाई फुले, जिजामाता यांचा आदर्श देऊन समता व बंधूत्त्वाच्या मार्गाने चालावे. महिलांनी संघटित होऊन नागपूर येथे २२ ते २४ आॅक्टोबर दरम्यान होणाºया महिला परिषदेला उपस्थित राहावे, असे आवाहन नागपूरचे भैय्याजी खैरकर यांनी केले.
पंचशील महिला व समाज मंडळ रामनगर, शाहूनगर, कॅम्प एरिया यांच्या संयुक्त विद्यमाने पंचशील बुद्धविहाराच्या पटांगणात जिल्हास्तरीय महिला परिषदेचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. उद्घाटन डॉ. यशवंत दुर्गे यांच्या हस्ते पार पडले. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष योगिता पिपरे होत्या. प्रमुख अतिथी म्हणून प्रा. माधुरी गायधने, सुष्मा भट, वंदना वनकर, योगिता सहारे, सिद्धार्थ गोवर्धन, प्रतिभा चौधरी, विश्रोजवार, म्हस्के, प्रभाकर सोनडवले, प्रा. एस. एस. जांभुळे, हेमंत मेश्राम, दर्शना मेश्राम उपस्थित होत्या.
परिषदेत डॉ. दुर्गे, सोनडवले, म्हस्के यांचा शाल, व शिल्ड देऊन सत्कार करण्यात आला. २० आॅगस्ट १९४२ ला बाबासाहेबांनी देशातील महिला परिषद आयोजित केली. या परिषदेला ७५ वर्षे पूर्ण झाल्याने नागपूर येथे २२ ते २४ आॅक्टोबर २०१७ रोजी महिला परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेला उपस्थित राहावे, असे आवाहन प्रा. माधुरी गायधने यांनी केले.
फुले-शाहू- आंबेडकर यांच्या विचार प्रवाहात येऊन संविधानाने दिलेल्या हक्क व कर्तव्याचे पालन केल्यास ओबीसी महिलांची उन्नती होईल, असे प्रतिपादन सुषमा भट यांनी केले. संचालन वनिता बांबोळे तर आभार धारा मेश्राम यांनी मानले. यशस्वीतेसाठी सिद्धार्थ गोवर्धन, डी. आर. जांभुळकर, बोरकर, प्रेमकुमार मेश्राम, रामटेके, निलेश फुलझेले, नागसेन खोब्रागडे, उत्तम मेश्राम, सुप्रिया मेश्राम, राखी मेश्राम, शीला शेंडे, राखी गोवर्धन, मीनल देवगडे, गेडाम, तारा खोब्रागडे, मालता मेश्राम, केसलापुरे यांनी सहकार्य केले.