विविध राजकीय पक्षांतील महिला पदाधिकारी आल्या एका मंचावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2022 05:00 AM2022-03-09T05:00:00+5:302022-03-09T05:00:35+5:30

जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाने महिला दिनाचे औचित्य साधून विशेष कामगिरी करणाऱ्या महिला कर्मचारी तथा अधिकाऱ्यांच्या सत्काराचे आयोजन मंगळवारी केले होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात झालेल्या या कार्यक्रमात वेगवेगळ्या पक्षांत सक्रिय असलेल्या महिला पदाधिकारी एका मंचावर आल्याचे दुर्मीळ चित्र पाहायला मिळाले. 

Women office bearers from various political parties came on one platform | विविध राजकीय पक्षांतील महिला पदाधिकारी आल्या एका मंचावर

विविध राजकीय पक्षांतील महिला पदाधिकारी आल्या एका मंचावर

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाने महिला दिनाचे औचित्य साधून विशेष कामगिरी करणाऱ्या महिला कर्मचारी तथा अधिकाऱ्यांच्या सत्काराचे आयोजन मंगळवारी केले होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात झालेल्या या कार्यक्रमात वेगवेगळ्या पक्षांत सक्रिय असलेल्या महिला पदाधिकारी एका मंचावर आल्याचे दुर्मीळ चित्र पाहायला मिळाले. 
 महिला मेळावा, सत्कार आणि पुरस्कार वितरण सोहळा, असे या कार्यक्रमाचे स्वरूप होते. जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर पोरेटी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी संजय मीणा यांच्या हस्ते पार पडले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आर.एम. भुयार, महिला व बालकल्याण सभापती रोशनी पारधी, समाजकल्याण सभापती रंजिता कोडापे, जि.प. सदस्य तथा महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष रूपाली पंदीलवार, जि.प. सदस्य तथा भाजपाच्या पदाधिकारी योगिता भांडेकर, जि.प. सदस्य ॲड. राम मेश्राम, एम.एम. डोनाडकर, एन.जी. ढोरे, आर.एस. अलोने आदी महिला सदस्य, उपमुख्य कार्यकारी अधिकारी फरेंद्र कुतीरकर जिल्हा महिला व बालविकास अधिकारी भांदककर, जिल्हा समाजकल्याण अधिकारी श्रीमती आत्राम, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बालकल्याण) अर्चना इंगोले आदी प्रामुख्याने उपस्थित होते. 
कार्यक्रमाचे संचालन देसाईगंजच्या बालविकास प्रकल्प अधिकारी श्रीमती लाडके यांनी केले, तर आभारप्रदर्शन कुरखेडाचे बालविकास प्रकल्प अधिकारी गणेश कुकडे यांनी केले. या कार्यक्रमाला जिल्हाभरातील बालविकास प्रकल्प अधिकारी, पर्यवेक्षिका, अंगणवाडीसेविका, मदतनीस आणि जिल्हा परिषदेचे समस्त अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने राजकीय वेगवेगळ्या पक्षांच्या महिला पदाधिकाऱ्यांना एकत्रित पाहून उपस्थितांमध्ये चर्चा सुरू हाेती.

५२ जणांना सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या संकल्पनेतून १५ व्या वित्त आयोग निधीतून अंगणवाडीतील कुपोषित बालकांना विशेष आहार देण्यात येत आहे. हा आहारामुळे कुपोषणाचे प्रमाण कमी करण्याकरिता प्रकल्पस्तरावर उत्कृष्ट कार्य केलेल्या अंगणवाडीसेविका, मदतनीस, अंगणवाडी पर्यवेक्षिका, बालविकास प्रकल्प अधिकारी व विस्तार अधिकारी, अशा एकूण ५२ जणांना सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र देऊन यावेळी गौरविण्यात आले. जिल्हाधिकारी मिणा यांनी असेच चांगले कार्य करून जिल्हा कुपोषणमुक्त करा, अशा शुभेच्छा दिल्या.

 

Web Title: Women office bearers from various political parties came on one platform

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Womenमहिला