महिलांची २६ कोटींची बचत

By admin | Published: September 30, 2016 01:30 AM2016-09-30T01:30:05+5:302016-09-30T01:30:05+5:30

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने महिला समृद्धी बचत ठेव योजना सुरू केली असून या योजनेंतर्गत ग्रामीण व दुर्गम भागातील केवळ महिलांचे खाते काढले जात आहेत.

Women save 26 crores | महिलांची २६ कोटींची बचत

महिलांची २६ कोटींची बचत

Next

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा उपक्रम : ६५ हजार ४४४ महिलांनी उघडले बँक खाते
गडचिरोली : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने महिला समृद्धी बचत ठेव योजना सुरू केली असून या योजनेंतर्गत ग्रामीण व दुर्गम भागातील केवळ महिलांचे खाते काढले जात आहेत. मागील दोन वर्षांच्या कालावधीत या योजनेंतर्गत सुमारे ६५ हजार ४४४ महिलांचे बचत खाते काढण्यात आले असून या खात्यावर महिलांनी २६ कोटी ५३ लाख रूपयांची बचत केली आहे. बँकेच्या या उपक्रमामुळे महिलांना बचतीची सवय लागण्यास फार मोठी मदत झाली आहे.

गडचिरोली जिल्ह्याच्या ग्रामीण व दुर्गम भागात अजूनही आर्थिक साक्षरता झालेली नाही. त्यामुळे अनेक नागरिकांना बँकेचे व्यवहार कळत नाही. अनेक कुटुंबांचे बँक खाते सुद्धा नाही. त्यामुळे त्या कुटुंबाला अल्प बचतीची सवय लागलेली नाही. दरवर्षी प्राप्त झालेले उत्पन्न खर्च होते. आपात्कालीन स्थितीत त्याच्याकडे रूपयाचीही बचत राहत नाही. परिणामी सावकाराकडून किंवा जवळपासच्या नातेवाईकांकडून कर्ज काढावे लागते. ग्रामीण भागातील कुटुंबांना अल्प बचतीची सवय लागावी, या उद्देशाने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने केवळ महिलांचे खाते उघडण्यासाठी महिला समृद्धी बचत ठेव योजना सुरू केली. या योजनेंतर्गत ग्रामीण व दुर्गम भागातील केवळ महिलांचेच बँक खाते काढले जात आहेत. बँक खाते निघाल्यानंतर या बँक खात्यात थोडीफार रक्कम राहावी, असे प्रत्येकच महिलेला वाटू लागल्यानंतर महिलांनी आपल्या बँक खात्यामध्ये १५ दिवस ते १ महिन्याच्या कालावधीनंतर जेवढी रक्कम शक्य होईल, तेवढी रक्कम जमा करण्यास सुरुवात केली. हळूहळू कुटुंबाच्या उत्पन्नापैकी काही हिस्सा बचत होण्यास सुरुवात झाली. मागील दोन वर्षांच्या कालावधीत सुमारे ६५ हजार ४४४ महिलांचे बचत खाते काढण्यात आले आहेत. या बचत खात्यावर सद्य:स्थितीत २६ कोटी ५३ लाख ३ हजार रूपयांची बचत झाली आहे. हळूहळू या योजनेचा ग्रामीण व दुर्गम भागात प्रचार होण्यास सुरुवात झाली असल्याने महिला स्वत:हून बँक खाते काढत असून त्यामध्ये बचत सुद्धा करीत आहेत. या योजनेमुळे महिलांमध्ये आर्थिक साक्षरता निर्माण होण्याबरोबरच बचतीची सवयही लागण्यास फार मोठी मदत झाली आहे. (नगर प्रतिनिधी)

Web Title: Women save 26 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.