आर्थिक सुबत्तेसाठी महिलांनी बचत करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2017 01:42 AM2017-03-11T01:42:31+5:302017-03-11T01:42:31+5:30

स्वत:चा व कुटुंबाचा विकास साधण्यासाठी महिलांनी आर्थिकदृष्ट्या सुदृढ होणे गरजेचे आहे.

Women save for financial support | आर्थिक सुबत्तेसाठी महिलांनी बचत करावी

आर्थिक सुबत्तेसाठी महिलांनी बचत करावी

Next

मान्यवरांचा सूर : कृषी विज्ञान केंद्रात महिला मेळावा
गडचिरोली : स्वत:चा व कुटुंबाचा विकास साधण्यासाठी महिलांनी आर्थिकदृष्ट्या सुदृढ होणे गरजेचे आहे. महिलांनी आर्थिक बचत करून आर्थिक सुबत्ता साधावी, असा सूर मान्यवरांनी काढला.
लोकमत सखी मंच व कृषी विज्ञान केंद्र गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनाचे बुधवारी कृषी विज्ञान केंद्र सोनापूर येथे आयोजन करण्यात आले. यावेळी मान्यवर विचार व्यक्त करीत होते. कार्यक्रमाच्या सुरूवातीला सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला मार्ल्यापण व दीप प्रज्ज्वलन करण्यात आले. त्यानंतर गीत सादर करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. अमरशेट्टीवार होते. प्रमुख अतिथी म्हणून बोदली येथील शंकरराव मल्लेलवार हायस्कूलचे प्राचार्य मनीष शेटे, प्रज्ञा संस्कार कॉन्व्हेंटच्या मुख्याध्यापिका सविता सादमवार, लोकमत सखी मंचच्या जिल्हा संयोजिका प्रीती मेश्राम, नलिनी शेटे, कृषी विज्ञान केंद्राच्या विषय विशेषज्ज्ञ (गृहविज्ञान) प्रा. डॉ. योगिता सानप, डॉ. अलेक्झांडर उपस्थित होत्या.
व्यक्ती विविध व्यसनांवर मिळकत खर्च करीत असतो. त्यामुळे पैशांचा अपव्यय होत असून पैैसा सत्कार्यात लागत नाही. महिलांनी बचतीकडे वळावे, असे आवाहन मान्यवरांनी केले. सविता सादमवार, डॉ. सानप यांनी स्त्रियांनी सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रात नावलौकिक करावा, असे आवाहन केले. आभार ज्योती परसुटकर यांनी मानले. डॉ. विक्रम कदम, मयूर बेलसरे, सुनीता धोटे, हितेश राठोड, जितेंद्र कस्तुरे, प्रमोद भांडेकर, उप्परवार, अर्चना भांडारकर, मृणाल उरकुडे, वंदना दरेकर, विद्या चौधरी, जयश्री चांदेकर, मोनाली मेश्राम, ज्योती गहाणे, उषा भानारकर यांनी सहकार्य केले.

Web Title: Women save for financial support

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.