महिला बचत गटांना मिळणार रेशन दुकाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:43 AM2021-08-18T04:43:52+5:302021-08-18T04:43:52+5:30

संबंधित तहसील कार्यालयातून याबाबतचे अर्ज घेऊन ३१ ऑगस्टपर्यंत त्यांच्याकडे सादर करावे, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी केले आहे. नवीन ...

Women self help groups will get ration shops | महिला बचत गटांना मिळणार रेशन दुकाने

महिला बचत गटांना मिळणार रेशन दुकाने

googlenewsNext

संबंधित तहसील कार्यालयातून याबाबतचे अर्ज घेऊन ३१ ऑगस्टपर्यंत त्यांच्याकडे सादर करावे, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी केले आहे. नवीन रेशन दुकान परवाने मंजूर केले जात असलेल्या गावांमध्ये अहेरी तालुक्यातील दाडगेर, चौडमपल्ली, कोडेसेपल्ली, आपापल्ली, चिंतलपेठ, दामरंचा, गुंडेरा, येंकाबंडा, मांड्रा, आलापल्ली (२), पुसूकपल्ली, रेपनपल्ली, चिरेपल्ली, अहेरी, मोदुमतुरी, महागाव खु, महागाव या गावांचा समावेश आहे.

चामोर्शी तालुक्यातील गावांमध्ये ठाकूरनगर, नवग्राम, सिमुलतला, मुधोली तुकूम, नवेगाव पेठ (घोट), माडेमुधोली, चकचापलवाडा, मक्केपली चक नं.३, जानाळा तुकूम, चाकलपेठ, कळमगाव, आमगाव चक नं.२, नवरगाव, कुथेगाव, मुधेली चक नं.२, रायपूर, बेलागट्टा, लेनगुडा ही गावे आहेत.

याशिवाय भामरागड तालुक्यातील विसामुंडी, खंडीनैनवाडी, मरकनार, कियर, बोटनफुंडी, होडरी, लष्कर, कोसफुंडी, भामरागड-२, इरपनार, नेलगुंडा, मिडदापल्ली, भटपर, मडवेली, झारेगुडा आदी गावांमध्ये नवीन दुकाने दिली जाणार आहेत. मुलेचरा तालुक्यात कालीनगर, देवदा, कोलपल्ली, मुखडी, भगतनगर, वेग्नुर या गावांमध्ये दुकान परवाने दिले जाणार आहेत.

Web Title: Women self help groups will get ration shops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.