महिलांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रातही विकास साधावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 12:24 AM2018-03-16T00:24:05+5:302018-03-16T00:24:05+5:30

बचत गटाच्या माध्यमातून विविध व्यवसायात उतरलेल्या महिलांनी आता सामाजिक व राजकीय क्षेत्रातही रस घ्यावा. राजकारणात महिलांचा सहभाग वाढल्यास कारभार आणखी चांगला होईल.

Women should also develop in social and political fields | महिलांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रातही विकास साधावा

महिलांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रातही विकास साधावा

Next
ठळक मुद्देयोगिता भांडेकर : माविमच्या जिल्हा तेजस्विनी संमेलनात बचत गटाच्या महिलांना आवाहन

ऑनलाईन लोकमत
गडचिरोली : बचत गटाच्या माध्यमातून विविध व्यवसायात उतरलेल्या महिलांनी आता सामाजिक व राजकीय क्षेत्रातही रस घ्यावा. राजकारणात महिलांचा सहभाग वाढल्यास कारभार आणखी चांगला होईल. त्यामुळे महिलांनी त्यात पुढे येऊन विकास साधावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष योगिता भांडेकर यांनी केले.
महिला आर्थिक विकास महामंडळ गडचिरोलीच्या वतीने महाराष्ट्र तेजस्विनी ग्रामीण महिला सक्षमीकरण कार्यक्रमाअंतर्गत आयोजित ‘जिल्हा तेजस्विनी संमेलन २०१८’च्या अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या. उद्घाटक म्हणून जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक सुनील पठारे, तर अतिथी म्हणून कृष्ठरोग विभागाचे सहायक संचालक डॉ.अमित साळवे होते. माविमच्या ९ लोकसंचालित साधन केंद्रातील १६० प्रमुख महिलांकरिता गटचर्चा आयोजित केली होती. त्यात पहिला विषय ‘स्वयंसहाय्य महिला बचत गटाची चळवळ वर्तमान व भविष्य’ हा होता. प्रमुख वक्ते म्हणून जि.प.सदस्य अ‍ॅड.लालसू नोगोटी, कुरखेडाच्या ज्येष्ठ समाजसेविका शुभदा देशमुख, ज्येष्ठ पत्रकार रोहिदास राऊत, महिला राजसत्ता आंदोलनाच्या जिल्हा संघटिका ज्योती मेश्राम, चेतन हिंगेकर नागपूर आदी उपस्थित होते. चर्चासत्राचा दुसरा विषय ‘कृषी उद्योगात महिलांची भूमिका वर्तमान व भविष्य’ असा होता. यात प्रमुख वक्ते म्हणून आत्माचे प्रकल्प संचालक डॉ.प्रकाश पवार, चामोर्शी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अतुल गण्यारपवार, तेजोमय लोक संचालित साधन केंद्र वडसाच्या अध्यक्ष ताराबाई धनबाते आदी होते. समारोप व बक्षीस वितरणाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश आयलवार, तर अतिथी म्हणून मुख्याधिकारी कृष्णा निपाने, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक प्रमोद भोसले, नाबार्डचे सहा.महाव्यवस्थापक कृष्णा कोल्हे, मत्स्यव्यवसाय विभागाचे उपायुक्त महादेव चांदेवार, सहा. आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी (विकास) एस.गौरकर, महिला संरक्षण अधिकारी डी.डी.महा आदी उपस्थित होते.
प्रास्ताविक माविमच्या वरिष्ठ जिल्हा समन्वय अधिकारी कांता मिश्रा यांनी तर संचालन यामिनी मातेरे व आभार प्रवीण काळबांधे यांनी मानले.
या साधन केंद्रांचा केला सत्कार
यावेळी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या साधन केंद्रांना रोख बक्षीस व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. त्यात सखी लोक संचालित साधन केंद्र गडचिरोली, कचरा व्यवस्थापनासाठी श्रमसाफल्य लोक संचालित साधन केंद्र चामोर्शी व मोहा लाडू प्रकल्पाकरिता त्रिवेणी संगम साधन केंद्र भामरागड, उत्कृष्ट कायदा साथी म्हणून जीवनज्योती साधन केंद्र वैरागड, उत्कृष्ट कृषीमित्र ज्ञानदीप साधन केंद्र आरमोरी, पशु सखी दीपज्योती साधन केंद्र धानोरा, उत्कृष्ट व्यवस्थापक तेजोमय साधन केंद्र वडसा, कृतीसंगम मध्ये संगम साधन केंद्र अहेरी व उत्कृष्ट व्यवस्थापनात संघर्ष लोक संचालित साधन केंद्र, जीमलगट्टा यांना रोख बक्षिसे व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

Web Title: Women should also develop in social and political fields

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.