महिलांनी उत्पन्नाचा स्त्रोत वाढविण्याचा प्रयत्न करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 12:39 AM2017-12-21T00:39:55+5:302017-12-21T00:40:46+5:30

महिलांनी बँकांकडून मिळालेल्या कर्जाचा चांगल्या पद्धतीने उपयोग करून त्या माध्यमातून उत्पन्नाचे स्त्रोत वाढविण्याचा प्रयत्न करावा, तसेच महिला सक्षमीकरणाच्या वाटचालीत पुढाकार घ्यावा, असे प्रतिपादन गडचिरोलीच्या नगराध्यक्ष योगीता प्रमोद पिपरे यांनी केले.

Women should try to increase the source of income | महिलांनी उत्पन्नाचा स्त्रोत वाढविण्याचा प्रयत्न करावा

महिलांनी उत्पन्नाचा स्त्रोत वाढविण्याचा प्रयत्न करावा

Next
ठळक मुद्देनगरध्यक्षांचे प्रतिपादन : गडचिरोली नगर पालिकेत उद्योजकता विकास कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : महिलांनी बँकांकडून मिळालेल्या कर्जाचा चांगल्या पद्धतीने उपयोग करून त्या माध्यमातून उत्पन्नाचे स्त्रोत वाढविण्याचा प्रयत्न करावा, तसेच महिला सक्षमीकरणाच्या वाटचालीत पुढाकार घ्यावा, असे प्रतिपादन गडचिरोलीच्या नगराध्यक्ष योगीता प्रमोद पिपरे यांनी केले.
राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाअंतर्गत स्थानिक नगर पालिकेच्या वतीने बुधवारी न.प.मध्ये आयोजित उद्योजकता विकास कार्यक्रमात त्या अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या. यावेळी मंचावर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे व्यवस्थापक सोरते, महिला व बालकल्याण सभापती अल्का पोहणकर, उपसभापती वैष्णवी नैताम, नगरसेविका लता लाटकर, नीता उंदीरवाडे, नगरसेवक प्रमोद पिपरे आदी उपस्थित होते.
यावेळी नगराध्यक्ष पिपरे यांनी न.प. च्या वतीने बँकांकडे पाठविण्यात आलेली वैयक्तिक कर्ज प्रकरणे, महिला बचतगटांची कर्ज प्रकरणे, वाटप करण्यात आलेल्या लाभार्थ्यांना व्यवसायिक कौशल्य, व्यावहारिकपणा, हितसंबंध आदीबाबत मार्गदर्शन केले. बँक आॅफ इंडियाच्या जिल्हा अग्रणी प्रबंधकांनी बँकांकडून मिळणाऱ्या कर्जाविषयी व ग्राहकांना येणाऱ्या अडचणीसंदर्भात मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक गणेश ठाकरे यांनी केले तर आभार गणेश नाईक यांनी मानले. यशस्वीतेसाठी विशाल गजबे, महेश निलम, छगन काळबांधे, दिनेश धोटे, मोंगसू मडावी आदींनी सहकार्य केले. सोरते यांनीही आर्थिक साक्षरतेविषयी महिलांना माहिती दिली.

Web Title: Women should try to increase the source of income

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.