गरजू लाेकांसाठी महिला काॅंग्रेस राबविणार भाेजन उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:36 AM2021-05-13T04:36:44+5:302021-05-13T04:36:44+5:30
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्याध्यक्ष आणि राज्य महिला काँग्रेसच्या प्रभारी आमदार प्रणिती शिंदे व प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्ष संध्या ...
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्याध्यक्ष आणि राज्य महिला काँग्रेसच्या प्रभारी आमदार प्रणिती शिंदे व प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्ष संध्या सव्वालाखे यांच्या हस्ते या उपक्रमाचा ऑनलाइन शुभारंभ साेमवारी करण्यात आला. याप्रसंगी संगीता तिवारी व संगीता धोंडे उपस्थित होत्या.
गृहिणी घरी रोज स्वयंपाक करीत असतात, त्याच स्वयंपाकात प्रत्येक महिला काँग्रेस कार्यकर्त्यांनी दहा ते बारा चपात्या अधिक करून हा डब्बा गरजू लोकांना पोहाेचवावा, असा उद्देश या उपक्रमाचा असून त्यासाठी एक केंद्र तयार करून सर्व जमलेले डब्बे गरजू लोकांपर्यंत पोहाेचविले जाणार आहेत.
या माध्यमातून गरजू लोकांना पोटभर जेवण मिळेल आणि राजकारणाच्या माध्यमातून जनसेवा घडून येईल, असे आवाहन आमदार प्रणिती शिंदे यांनी केले. ऑनलाइन सभेत महिलांच्या अनेक प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. या वेळी प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे यांनी शिवभोजन थाळी केंद्र महिलांना मिळावे, सर्व समितींमध्ये महिलांना स्थान मिळावे, त्यासबोतच महिलांना स्वयंरोजगार मिळावा व महिलांसाठी स्वतंत्र लसीकरण केंद्र उभारावे, अशा मागण्यांवर चर्चा करून त्या मागण्या सरकारसमाेर मांडण्यात येतील, असे ठरविण्यात आले. ऑनलाइन सभेत महिला काॅंग्रेसच्या पदाधिकारी सहभागी झाल्या हाेत्या, अशी माहिती महिला काॅंग्रेसच्या जिल्हाध्यक्ष भावना वानखेडे यांनी दिली.