दारूबंदीसाठी महिलांचा एल्गार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2019 12:54 AM2019-03-10T00:54:57+5:302019-03-10T00:55:26+5:30
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून तालुक्यातील किटाळी, आकापूर, पेठतुकूम, इंजेवारी या चार गावांतील मुक्तिपथ गाव संघटनेच्या महिलांची विशेष सभा शुक्रवारी घेण्यात आली. या बैठकीत महिलांनी अवैध दारूविक्री बंद करण्यासाठी दारूविक्रेत्यांच्या विरोधात एकजूट होण्याचा निर्धार केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
आरमोरी : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून तालुक्यातील किटाळी, आकापूर, पेठतुकूम, इंजेवारी या चार गावांतील मुक्तिपथ गाव संघटनेच्या महिलांची विशेष सभा शुक्रवारी घेण्यात आली. या बैठकीत महिलांनी अवैध दारूविक्री बंद करण्यासाठी दारूविक्रेत्यांच्या विरोधात एकजूट होण्याचा निर्धार केला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि. प. शाळेच्या शिक्षिका एस.जी. बेहरे होत्या. प्रमुख मार्गदर्शक म्हणून भारती महिला फेडरेशनच्या सचिव मीनाक्षी सेलोकर तर अतिथी म्हणून मुक्तिपथचे उपसंचालक संतोष सावळकर, सरपंच हरी भोयर, उपसरपंच राजेश लिंगायत, पोलीस पाटील वामन बांबोळे, विलास मेश्राम, तंटामुक्ती अध्यक्ष मुखरू बांबोळे, ग्रा.पं.सदस्य योगेश नरुले, दादाजी लोहर, निकिता नागरे, जयश्री लोणारे, यामिना जुमनाके, अश्विनी बांडे, मुख्याध्यापक चौधरी, समुपदेशक किरण दहीकर आणि क्षयरोग समन्वयक किशोर हर्षे उपस्थित होते. सेलोकर यांनी जागतिक महिला दिनाचा इतिहास महिलांना सांगितला. स्त्रियांच्या हक्कासाठी सुरु असलेल्या चळवळींची माहिती त्यांनी यावेळी दिली. संतोष सावळकर यांनी, ‘नही चलेगी, नही चलेगी, गाव में दारू नही चलेगी’ असा नारा दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संगीता मडावी, संचालन शारदा बांडे यांनी तर आभार वृंदा कांबळे यांनी मानले. मुक्तिपथ अभियानाच्या तालुका संघटक नीलम हरीणखेडे, उपसंघटक प्रकाश कुनघाडकर यांनी कार्यक्रमासाठी सहकार्य केले.
खर्रा सोडणाऱ्यांचा सत्कार
महिलांनी खर्राबंदीसाठी पुढाकार घेऊन गावात खर्राबंदीसाठी प्रयत्न करावे, तसेच दुष्परिणामांची माहिती सांगावी, असे आवाहन याप्रसंगी करण्यात आले. सोबतच खर्रा खाणे सोडणाऱ्या आठ व न खाण्याचा संकल्प करणाºया दोन महिलांचा सत्कार करण्यात आला.