विकासात महिलांचा सहभाग आवश्यक

By admin | Published: March 13, 2016 01:21 AM2016-03-13T01:21:26+5:302016-03-13T01:21:26+5:30

देशाच्या एकूण लोकसंख्येच्या निम्मी लोकसंख्या महिलांची आहे. त्यामुळे महिलांचे सक्षमीकरण करून त्यांचा विकासात

Women's participation in development is essential | विकासात महिलांचा सहभाग आवश्यक

विकासात महिलांचा सहभाग आवश्यक

Next

पालकमंत्र्यांचे प्रतिपादन : प्रदर्शनी-विक्री व सांस्कृतिक महोत्सव
गडचिरोली : देशाच्या एकूण लोकसंख्येच्या निम्मी लोकसंख्या महिलांची आहे. त्यामुळे महिलांचे सक्षमीकरण करून त्यांचा विकासात सहभाग करून घेतल्याशिवाय विकसीत भारताची कल्पनाच करणे अशक्य आहे. बचत गट स्थापन करून स्वत:चा उद्योग निर्माण केला पाहिजे, असे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास राज्यमंत्री तथा पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी केले.
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा गडचिरोलीद्वारे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत महिला स्वयंसहाय्यता गट व वैयक्तिक स्वयंरोजगारांनी निर्माण केलेल्या वस्तूंची प्रदर्शनी- विक्री व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन गडचिरोली येथील अभिनव लॉन येथे १२ ते १६ मार्च दरम्यान करण्यात आले आहे. या प्रदर्शनीचे उद्घाटन ना. अम्ब्रीशराव आत्राम यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संपदा मेहता होत्या. प्रमुख अतिथी म्हणून जि.प. सदस्य प्रशांत वाघरे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डी. के. बारापात्रे, नंदू काबरा, प्रमोद पिपरे, अविनाश गेडाम, गजानन येनगंधलवार, प्रतिभा चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रास्ताविक प्रकल्प संचालक बारापात्रे तर संचालन केंद्र प्रमुख राजू वडपल्लीवार यांनी केले. (नगर प्रतिनिधी)

Web Title: Women's participation in development is essential

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.