दुग्ध व्यवसायातून महिलांची स्वावलंबनाकडे वाटचाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:48 AM2021-06-16T04:48:03+5:302021-06-16T04:48:03+5:30

नवतेजस्वीनी ज्ञानगंगा दूध संकलन केंद्र चुरमुरा, ज्ञानदीप लाेकसंचालित साधन केंद्र आरमाेरीच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी प्रमुख ...

Women's transition from dairy business to self-reliance | दुग्ध व्यवसायातून महिलांची स्वावलंबनाकडे वाटचाल

दुग्ध व्यवसायातून महिलांची स्वावलंबनाकडे वाटचाल

Next

नवतेजस्वीनी ज्ञानगंगा दूध संकलन केंद्र चुरमुरा, ज्ञानदीप लाेकसंचालित साधन केंद्र आरमाेरीच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी सचिन यादव, माविमच्या वरिष्ठ जिल्हा समन्वय अधिकारी कांता मिश्रा, कृषी विज्ञान केंद्राचे जिल्हा समन्वयक संदीप कऱ्हाळे, चुरमुराचे सरपंच ईश्वर कुरे, उपसरपंच मीतल कांबळे, पाेलीस पाटील सतीश जम्पलवार, तंमुस अध्यक्ष गाेविंदराव राऊत, दूध संकलन केंद्राच्या अध्यक्ष निराशा लाेणारे, सचिव संगीता भाेयर, पशुसखी वर्षा रामटेके आदींसह बचत गटाच्या महिला उपस्थित हाेत्या.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक साधन केंद्राच्या व्यवस्थापक अल्का मेश्राम, संचालन वरिष्ठ सहयाेगीनी सरिता सहारे यांनी केले तर आभार संगीता लाेणारे यांनी मानले.

बाॅक्स ....

वसाच्या प्रकल्पाला भेट

चुरमुरा येथील दूध संकलन केंद्राच्या शुभारंभाचा कार्यक्रम पार पडल्यानंतर सहायक जिल्हाधिकारी एम. मुरगानंदम यांच्यासह सर्व मान्यवरांनी पाेर्ला नजीकच्या वसा येथील दुग्ध विकास प्रकल्पाला भेट दिली. येथे तेजस्वीनी वैनगंगा महिला दुग्ध उत्पादक सहकारी संस्थेच्यावतीने दरराेज २५० ते ३०० लिटर दुधाचे संकलन केले जात आहे. महिलांचे काम पाहून सहायक जिल्हाधिकारी मुरगानंदम यांनी काैतुक केले. याप्रसंगी दुधासाेबतच विविध दुग्धजन्य पदार्थ कसे तयार करावे, याबाबतची माहिती कांता मिश्रा व संदीप कऱ्हाळे यांनी महिलांना दिली.

बाॅक्स......

दुग्ध संकलन केंद्राचा विस्तार हाेणार

गडचिराेली तालुक्यातील वसा, देसाईगंज तालुक्यातील काेंढाळा, चामाेर्शी तालुक्यातील भेंडाळा, अहेरी तालुक्यातील महागाव आदींसह जिल्हाभरात एकूण १२ ठिकाणी बचत गटाच्या महिलांमार्फत दूध संकलनाचा व्यवसाय केला जात आहे, अशी माहिती माविमच्या वरिष्ठ जिल्हा समन्वय अधिकारी कांता मिश्रा यांनी कार्यक्रमात दिली. या दुग्ध संकलन केंद्राचा विस्तार करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Women's transition from dairy business to self-reliance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.