कौतुकास्पद! आदिवासी मुलाने चित्रकौशल्यातून साकारली लेक वाचवा, लेक शिकवा रांगोळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2018 11:35 AM2018-01-05T11:35:24+5:302018-01-05T11:37:30+5:30
देसाईगंजमधील फोकडी या गावात असलेल्या आश्रमशाळेत शिकणारा संतोष नैताम हा विद्यार्थी येथील शिक्षक व गावकऱ्यांच्या कौतुकाचा विषय ठरला आहे.
ठळक मुद्देमोठा चित्रकार होण्याचा त्याचा मानस
विष्णू दुनेदार
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली: त्याने साकारलेल्या रांगोळीला पहायला अनेकजण त्याच्या आश्रमशाळेला भेट देत आहेत. लेक वाचवा लेक शिकवा या विषयावर त्याने शाळेच्या प्रांगणात सुरेख रांगोळ्या चितारून साऱ्यांना विस्मयचकित करून टाकले आहे.
सातव्या वर्गात शिकणाऱ्या संतोषला लहानपणापासूनच रांगोळी व चित्रे काढण्याची आवड होती. त्याने जेव्हा आश्रमशाळेत प्रवेश घेतला तेव्हा तेथील वाय.के. भोयर सर व किरण सहारे मॅडम यांनी त्याच्यातील सुप्त गुण ओळखून त्याला प्रोत्साहन दिले. त्यांच्या प्रोत्साहनामुळे संतोषच्या चित्रकलेला एक वेगळी दिशा मिळाली.