लाकूड बिट भरलेला ट्रक उलटला

By admin | Published: September 22, 2016 02:24 AM2016-09-22T02:24:05+5:302016-09-22T02:24:05+5:30

सुबाबूळचे लाकूड बिट घेऊन जाणारा एमएच-३४-एम-५७०६ क्रमांकाचा ट्रक बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास घोट-आष्टी मार्गावरील

The wood bit filled truck filled up | लाकूड बिट भरलेला ट्रक उलटला

लाकूड बिट भरलेला ट्रक उलटला

Next

वाहतूक ठप्प : घोट-आष्टी मार्गावर अपघात; जीवितहानी नाही
घोट : सुबाबूळचे लाकूड बिट घेऊन जाणारा एमएच-३४-एम-५७०६ क्रमांकाचा ट्रक बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास घोट-आष्टी मार्गावरील घोटपासून पाच किमी अंतरावर असलेल्या नाल्याजवळ उलटला. यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णत: ठप्प झाली.
एमएच-३४-एम-५७०६ क्रमांकाचा ट्रक सुबाबूळचे बिटची वाहतूक करीत होता. दरम्यान या ट्रकवरील चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने घोटपासून पाच किमी अंतरावर रस्त्याच्या मधोमध सदर ट्रक उलटला. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक सकाळी ६.३० वाजतापर्यंत ठप्प होती. घोट पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी जायभाय यांना मिळताच त्यांनी सकाळी घटनास्थळी पोलीस कर्मचाऱ्यांना पाठविले. पोलिसांनी रस्त्यावरील पडलेली लाकूड बिटे बाजुला करून रस्ता मोकळा केला. ट्रकच्या समोरच्या चाकाचा मुख्य पट्टा तुटल्याने अपघात झाला. मात्र यात जीवितहानी झाली नाही. घटनास्थळावर चालक व वाहक यापैकी कोणीही आढळून आले नाही. त्यामुळे ट्रकचालक कोण होता, याची माहिती मिळाली नाही. (वार्ताहर)

Web Title: The wood bit filled truck filled up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.