आलापल्ली ते चोखेवाडा रस्त्याचे काम लवकरच पूर्ण होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:25 AM2021-06-10T04:25:00+5:302021-06-10T04:25:00+5:30
मंगळवारी एटापल्ली येथे भगवंतराव महाविद्यालयात पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी ही माहिती दिली. या रस्त्याच्या कामाला अनेक वर्षांपासून मंजुरी मिळाली ...
मंगळवारी एटापल्ली येथे भगवंतराव महाविद्यालयात पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी ही माहिती दिली. या रस्त्याच्या कामाला अनेक वर्षांपासून मंजुरी मिळाली होती. मात्र, कंत्राटदार काम करण्यास तयार नव्हते, मागील वर्षीच काम सुरू व्हावे याकरिता मी प्रयत्नशील होतो; परंतु लाॅकडाऊनमुळे काम होऊ शकले नाही. या ६१ कि.मी. अंतरावरील कामाला १५१ कोटी रुपयांची तरतूद आहे; परंतु सदर काम हे सुरजागड मायनिंगचे काम करणारी त्रिवेणी कंपनी करणार आहे. पहाळीवरील लोहदगळ वाहतूक या मार्गाने होणार असल्याने शासनाच्या तरतूद रकमेपेक्षा अतिरिक्त पैसा खर्च करून या रस्त्याचे काम करणार आहे. यासह दहा वर्षे या रस्त्याच्या देखरेखीची जबाबदारी कंपनीची असल्याने चांगला रस्ता बनेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. नागरिकांच्या मागणीनुसार कसनसूर येथे ३३ केव्हीचा विद्युत प्रकल्प उभारण्याकरिता पाठपुरावा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. सुरजागड प्रकल्पामध्ये स्थानिकांना नाेकरी द्यावी, अशी स्पष्ट भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला जि.प. सदस्या भाग्यश्री आत्राम, त्रिवेणी कंपनीचे प्रकल्प अधिकारी कर्नल विक्रम मेहता उपस्थित होते.
बाॅक्स :
रस्ता कामाचा शुभारंभ
एटापल्ली वन तपासणी नाक्याजवळ आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते सदर रस्ता कामाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी जि.प. सदस्या भाग्यश्री आत्राम, बबलू हकीम, शाहीम हकीम, विक्रम मेहता, डाॅ. चरणजितसिंग सलुजा, तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते.