चामाेर्शी महामार्गाचे काम पून्हा ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:33 AM2021-03-07T04:33:52+5:302021-03-07T04:33:52+5:30
जवळपास चार फुट खाेल खाेदून ठेवण्यात आला आहे. पलिकडे शेकडाे नागरिकांची घरे आहेत. मार्ग खाेदून ठेवला असल्याने वाहने नेणे ...
जवळपास चार फुट खाेल खाेदून ठेवण्यात आला आहे. पलिकडे शेकडाे नागरिकांची घरे आहेत. मार्ग खाेदून ठेवला असल्याने वाहने नेणे कठीण झाले आहे. वाहन रस्त्यावर ठेवून घरी जावे लागत आहे. काही नागरिक तर दुसऱ्याच्या घरी वाहने ठेवत आहेत. एका बाजूचा मार्ग झाला आहे. तर दुसरी बाजू खाेदण्यात आली आहे. एखादे भरधाव वेगातील वाहन थाेडे जरी बाजूला गेले तरी ते उलटण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच पाऊस आल्यास चिखल हाेण्याची शक्यता आहे. ही अतिशय गंभीर बाब आहे. काम सुरू करायचेच नव्हते तर खाेदकाम का करण्यात आले असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. कंत्राटदाराच्या नियाेजन शुन्य कारभारामुळे नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत. नागरिकांमध्ये राेष व्यक्त हाेत आहे. याचा एक दिवस भडका हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही. कंत्राटदाराकडून व्यवस्थित काम करून घेण्याची जबाबदारी राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणची आहे. मात्र याकडे अधिकाऱ्यांचेही दुर्लक्ष हाेत असल्याने कंत्राटदाराची मनमानी वाढली आहे.