सुक्ष्म नियोजनातून काम करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2017 01:01 AM2017-09-01T01:01:13+5:302017-09-01T01:01:25+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून शेतीच्या शाश्वत विकासासोबतच संपूर्ण देशाचा विकास साधण्यासाठी संकल्प ते सिद्धी हा कार्यक्रम आखण्यात आला आहे.

Work with microscopic planning | सुक्ष्म नियोजनातून काम करा

सुक्ष्म नियोजनातून काम करा

Next
ठळक मुद्दे‘संकल्प ते सिद्धी’ कार्यक्रम : हंसराज अहीर यांचे जिल्ह्यातील अधिकारी व कर्मचाºयांना निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून शेतीच्या शाश्वत विकासासोबतच संपूर्ण देशाचा विकास साधण्यासाठी संकल्प ते सिद्धी हा कार्यक्रम आखण्यात आला आहे. ग्रामीण भागात शेतीवर उपजीविका असणारी लोकसंख्या मोठी आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी व सर्वसामान्य नागरिक सुखी व समृद्ध झाला पाहिजे, यासाठी गडचिरोली जिल्ह्यातील अधिकारी व कर्मचाºयांनी सुक्ष्म नियोजनातून काम करावे, असे निर्देश केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिले.
कृषी विज्ञान केंद्र सोनापूर (गडचिरोली) आणि आत्मा गडचिरोलीच्या संयुक्त विद्यमाने गुरूवारी आरमोरी मार्गावरील सभागृहात आयोजित संकल्प ते सिद्धी या कार्यक्रमात ते उद्घाटक म्हणून बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी राज्याचे आदिवासी विकास, वने राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम होते. प्रमुख अतिथी म्हणून खा. अशोक नेते, आ. डॉ. देवराव होळी, आ. कृष्णा गजबे, जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक, कृषी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. डी. एम. मानकर, आत्माचे संचालक डॉ. प्रकाश पवार, घनश्याम चोपडे, माजी आ. अतुल देशकर, नगराध्यक्ष योगीता पिपरे, जि. प. कृषी सभापती नाना नाकाडे, नगर पालिकेचे उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, नगरसेवक प्रमोद पिपरे, बाबुराव कोहळे, प्रकाश अर्जुनवार, एस.बी. अमरशेट्टीवार, रमेश भुरसे, प्रकाश गेडाम, डॉ. भारत खटी, आनंद भांडेकर, प्रशांत वाघरे, प्रतिभा चौधरी, मोतीलाल कुकरेजा आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना ना. अहीर म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात दिशा ठरवून देशात विकासाचे काम सुरू आहे. भारताला मिळालेले स्वराज्य हे सुराज्यात बदलवायचे आहे. देशातून जातीवाद, गरीबी, बेरोजगारी, आतंकवाद संपवून देशाला समृद्ध करावयाचे आहे. भारताला सुखी, समुद्ध व बलशाली बनविण्याचे स्वप्न पंतप्रधान मोदींनी पाहिले आहे. त्या दिशेने केंद्र व राज्य सरकारची नियोजनबद्ध पद्धतीने वाटचाल सुरू आहे. ग्रामीण भाग विकसित झाल्यास संपूर्ण देश विकसित होईल, त्यासाठी शेती विकासाला केंद्र सरकारने केंद्रबिंदू मानले आहे. शेवटच्या माणसाची प्रगती झाली पाहिजे, असे ना. अहीर म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना कार्यक्रम हाती घेतला आहे. सिंचन विकासातून शेती समृद्ध करण्याचे शासनाचे उद्दिष्ट आहे. या योजनेतून अनेक अपूर्ण प्रकल्प पूर्ण होणार आहेत. शेतकºयांना कर्जमाफीची गरज पडणार नाही, अशी व्यवस्था निर्माण करण्यासाठी केंद्र शासन प्रयत्नशील आहे. संकल्प ते सिद्धी न्यू इंडिया मंथन या कार्यक्रमातून पंतप्रधान मोदी यांना २०२२ पर्यंत देशातील शेतकºयांचे उत्पादन व उत्पन्न दुप्पट करावयाचे आहे. यासाठी शेतकºयांना रब्बी व खरीप हंगामात विविध प्रकारची पिके घेणे आवश्यक आहे. त्यासाठी कृषी विभागाने नियोजनबद्ध कार्यक्रम आखून त्याची अंमलबजावणी करावीे, असेही ना. हंसराज अहीर यांनी सांगितले. याप्रसंगी खासदार अशोक नेते, आमदार डॉ. देवराव होळी, आ. कृष्णा गजबे यांनीही मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. विलास तांबे, संचालन प्रा. राकेश चडगुलवार यांनी केले तर आभार डॉ. अनिल तारू यांनी मानले. कार्यक्रमाला कृषी विज्ञान केंद्र, आत्माचे अधिकारी, कर्मचारी, शेतकरी तसेच भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
कामचुकार अधिकाºयांची गय नाही
केंद्र शासनाने पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली शेती विकासासाठी न्यू इंडिया मंथन ‘संकल्प से सिद्धी’ हा कार्यक्रम हाती घेतला आहे. या कार्यक्रमाअंतर्गत कृषी विभागासह जिल्ह्यातील सर्व अधिकाºयांनी सुक्ष्म नियोजन करून योग्य काम केले पाहिजे, केवळ देखावा करून चालणार नाही, कर्तव्यात कसूर करणाºया कामचुकार अधिकारी व कर्मचाºयांची आता गय नाही, असा दम ना. अहीर यांनी यावेळी अधिकाºयांना दिला. सदर कार्यक्रमात राज्याचा कृषी विभाग व जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या अधिकाºयांची अनुपस्थिती होती. यावर कदाचित या अधिकाºयांना आमंत्रण नसेल. मात्र या कार्यक्रमाची अंमलबजावणी सर्वांच्या सहकार्यातून व समन्वयातून करावयाची आहे. हे कृषी विभागाच्या अधिकाºयांनी लक्षात घेतले पाहिजे, असा इशाराही ना. अहीर यांनी दिला.
सर्वांच्या सहकार्याने संकल्प तडीस नेऊ- पालकमंत्री
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारत देश, महाराष्टÑासह गडचिरोली जिल्ह्याला जगात नवीन ओळख द्यायची आहे. त्यामुळेच केंद्र व राज्य सरकारने विकासाचा सातसुत्री कार्यक्रम हाती घेतला आहे. शेतकºयांना स्वावलंबी बनवून महिलांचे सक्षमीकरण करायचे आहे. त्यासाठी संकल्प ते सिद्धी कार्यक्रमातून सर्वांनी काम करणे आवश्यक आहे. सर्वांच्या सहकार्याने विकासाचा संकल्प तडीस नेऊ, असा आशावाद पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी व्यक्त केला.
रक्तरंजीत क्रांतीने विकास अशक्य
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना रक्तरंजीत क्रांती नको होती, त्यामुळेच त्यांनी शांतीचा संदेश देणारा बुद्धाचा धम्म स्वीकारला. रक्तरंजीत क्रांतीने कुठलाही विकास होत नाही. नक्षलवाद हा गडचिरोली जिल्हा विकासासाठी घातक आहे. त्यामुळे नक्षल्यांचा विरोध करा, असे आवाहन ना. हंसराज अहीर यांनी यावेळी केले.देशविरोधी कारवाया रोखण्यासाठी सरकारने कठोर पावले उचलली आहे.केद्रिय गहखाते आता गंभीर झाले आहे,असेही ते यावेळी म्हणाले.

Web Title: Work with microscopic planning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.