संपाने महावितरणचे कामकाज ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2019 10:34 PM2019-01-07T22:34:03+5:302019-01-07T22:37:13+5:30

वीज कर्मचारी-अभियंते संघटना संयुक्त कृती समितीच्या नेतृत्वात जिल्हाभरातील वीज कर्मचारी व अभियंत्यांनी ७ जानेवारी रोजी लाक्षणिक संप पुकारला आहे. यामुळे महावितरणचे कामकाज ठप्प पडले होते.

The work of MSED | संपाने महावितरणचे कामकाज ठप्प

संपाने महावितरणचे कामकाज ठप्प

Next
ठळक मुद्देअधीक्षक अभियंता कार्यालयासमोर आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : वीज कर्मचारी-अभियंते संघटना संयुक्त कृती समितीच्या नेतृत्वात जिल्हाभरातील वीज कर्मचारी व अभियंत्यांनी ७ जानेवारी रोजी लाक्षणिक संप पुकारला आहे. यामुळे महावितरणचे कामकाज ठप्प पडले होते.
महापारेषण कंपनीतील स्टाफ सेटअप लागू करताना मंजूर पदे कमी करू नये, महावितरण कंपनीतील प्रस्तावित पुनर्रचना करताना संघटनांनी केलेल्या सूचनांचा अंतरभाव करावा, खासगीकरण, फ्रेन्चायझी करण्याचे धोरण राबवावे, महानिर्मिती कंपनीच्या अधिकार क्षेत्रात कार्यरत असलेल्या लघुजल विद्युत निर्मित संचाचे शासनाने अधिग्रहण न करता महानिर्मिती कंपनीच्या अधिकार क्षेत्रात कार्यरत ठेवावे. २१० मेगाव्हॅटचे संच बंद करण्याचे धोरण थांबवावे, तिन्ही कंपन्यातील सर्व कर्मचाऱ्यांकरिता मान्य केलेली महाराष्टÑ शासनाच्या जुन्या पेन्शन योजनेच्या धरतीवर पेन्शन योजना लागू करावी, तिन्ही कंपन्यांमधील रिक्त पदे तातडीने भरावी, समाज काम, समान वेतनाचा नियम लागू करावा, आदी मागण्यांसाठी संप पुकारण्यात आला. १९ डिसेंबर २०१८ रोजी संघटनेच्या प्रमुख पदाधिकाºयांनी ऊर्जामंत्री बावणकुळे यांच्यासोबत चर्चा केली. मात्र मागण्या मान्य झाल्या नाही. त्यामुळे आंदोलनाचे नोटीस दिली होती.
२६ डिसेंबर रोजी विभागीय कार्यालयावर निदर्शने झाली. २८ डिसेंबरला परिमंडळ कार्यालयावर निदर्शने दिली. १ जानेवारी रोजी काळ्या फिती लावून काम केले. मात्र शासनाने सकारात्मक निर्णय न घेतल्याने ७ जानेवारी रोजी एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारण्यात आला. या संपात वीज कर्मचारी व अभियंते सहभागी झाल्याने महावितरणचे कामकाज ठप्प पडले होते. मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत संप पुकारण्याचा इशारा दिला आहे. आंदोलनात महाराष्टÑ स्टेट ईलेक्ट्रिक वर्कर्स फेडरेशन, वीज कामगार महासंघ, विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन, सबआॅर्डीनेट इंजिनिअर असोसिएशन, वीज तांत्रिक कामगार संघटना, महाराष्टÑ राज्य वीज कामगार काँग्रेस (इनटक) या संघटनांचे पदाधिकारी व सदस्य सहभागी झाले होते.

Web Title: The work of MSED

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.