राष्ट्रीय महामार्गाच्या कामामुळे धुळीचा त्रास वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 05:09 AM2021-03-04T05:09:14+5:302021-03-04T05:09:14+5:30

चामाेर्शी शहरात एका बाजूला रस्ता खोदकाम व नाली बांधकाम सुरू आहे तर दुसऱ्या बाजूने एकेरी वाहतूक सुरू आहे. मुख्य ...

Work on the national highway increased the dust problem | राष्ट्रीय महामार्गाच्या कामामुळे धुळीचा त्रास वाढला

राष्ट्रीय महामार्गाच्या कामामुळे धुळीचा त्रास वाढला

Next

चामाेर्शी शहरात एका बाजूला रस्ता खोदकाम व नाली बांधकाम सुरू आहे तर दुसऱ्या बाजूने एकेरी वाहतूक सुरू आहे. मुख्य मार्गावरूनच वाहने जे-जा करीत असतात. मात्र, आवागमन करणाऱ्या नागरिकांना धुळीचा त्रास सहन करावा लागताे. यापासून बचाव करण्यासाठी अनेक जण लक्ष्मी गेटसमोरून जुन्या तहसीलकडे जाणाऱ्या बायपास रस्त्यावरून प्रवास करतात. त्यामुळे या मार्गानेसुद्धा वाहनांची व पादचारी लाेकांची प्रंचड गर्दी दिसून येते. घोटवरून चामोर्शीमार्गे येणाऱ्या सर्व दुचाकी, चारचाकी व अवजड वाहनांचे आवागमन याच मार्गाने असते. अनेक वाहनधारक आपली वाहने रस्त्याच्या दुतर्फा उभी करून ठेवत असल्याने वाहतुकीस अडथळा येताे. वाहतुकीची काेंडी साेडविणे व धुळीच्या त्रासापासून नागरिकांची सुटका करण्यासाठी संबंधित विभागाने उपाययाेजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Web Title: Work on the national highway increased the dust problem

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.