पर्लकाेटा पुलाचे काम अधांतरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 05:00 AM2020-12-14T05:00:00+5:302020-12-14T05:00:39+5:30
भामरागडला लागून असलेली पर्लकाेटा नदी ही बारमाही वाहणारी नदी आहे. या नदीवर ठेंगणा जुना पूल आहे. दर वर्षीच्या पावसाळ्यात पर्लकाेटा नदीला अनेकदा पूर येताे. परिणामी पुलावर पाणी चढून अहेरी मार्ग बंद हाेताे. भामरागडवासीयांचा गडचिराेलीशी संपर्क तुटताे. पावसाळ्यातील महापुरामुळे भामरागडातील नागरिक यातना सहन करतात. नागरिकांच्या मागणीची दखल घेऊन व भामरागडात दळणवळण व्यवस्था वाढविण्यासाठी शासनाच्या वतीने पर्लकाेटा नदीवर पुलाचे बांधकाम मंजूर करण्यात आले.
लाेकमत न्यूज नेटवर्क
भामरागड : भामरागड नजीकच्या पर्लकाेटा नदीवरील मंजूर नवीन पुलाच्या कामाचे ग्रहण अजुनही सुटले नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने सर्व प्रक्रिया पार पाडून या कामाचे वर्कऑर्डर कंत्राटदाराला देण्यात आले. मात्र वन विभागाच्या आडकाठीमुळे या पुलाचे काम अजुनही सुरू झाले नाही. परिणामी याचा जाब विचारण्यासाठी भामरागडातील नागरिकांनी वन विभागाच्या कार्यालयावर धडक देऊन उपवनसंरक्षकांना जाब विचारला.
भामरागडला लागून असलेली पर्लकाेटा नदी ही बारमाही वाहणारी नदी आहे. या नदीवर ठेंगणा जुना पूल आहे. दर वर्षीच्या पावसाळ्यात पर्लकाेटा नदीला अनेकदा पूर येताे. परिणामी पुलावर पाणी चढून अहेरी मार्ग बंद हाेताे. भामरागडवासीयांचा गडचिराेलीशी संपर्क तुटताे. पावसाळ्यातील महापुरामुळे भामरागडातील नागरिक यातना सहन करतात. नागरिकांच्या मागणीची दखल घेऊन व भामरागडात दळणवळण व्यवस्था वाढविण्यासाठी शासनाच्या वतीने पर्लकाेटा नदीवर पुलाचे बांधकाम मंजूर करण्यात आले. वन विभागाच्या नियम व कायद्याच्या अडचणीमुळे वर्कआदेश देऊनही कंत्राटदाराला पुलाचे काम सुरू करता आले नाही. एकीकडे सरकार पुलाच्या कामाला मंजुरी देते तर सरकारच्या अधिनस्त असलेल्या वनविभागाचे कायदे या कामासाठी अडचणीचे ठरत आहे.पर्लकाेटा नदीवरील नवीन पुलाचे काम लवकर सुरू हाेऊन ते मार्गी लागावे, अशी आग्रही मागणी भामरागडवासीयांची आहे. दरम्यान काम सुरू न झाल्याचे पाहून वन विभागाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी शनिवारी विविध पक्षाचे कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांनी एकत्र येत वन विभागाचे कार्यालय गाठले. उपवनसंरक्षक एस.एल. बिलाेलीकर यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. दरम्यान भामरागड वन विभागाचा प्रभार माझ्याकडे नुकताच साेपविण्यात आला आहे. पर्लकाेटा नदीवरील पुलाच्या कामासंदर्भातील माहिती घेऊन आपणास देताे, असे त्यांनी गावकऱ्यांना सांगितले.
साहित्य व यंत्रसामग्री पडून
पर्लकाेटा नदीवरील नवीन पुलाचे बांधकाम सुरू करण्यासाठी कंत्राटदाराने या ठिकाणी माेठमाेठे मशीनरीज व यंत्रसामग्री आठ महिन्यांपासून भामरागड येथे आणून ठेवली आहे. मात्र वन विभागाच्या आडकाठीमुळे पुलाचे काम सुरू करता आले नाही. आता कंत्राटदार पूर्णत: कंटाळला असून हे साहित्य परत नेण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे.