३२७ ग्रा.पं.मध्ये राेहयाे कामे जाेमात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:39 AM2021-03-09T04:39:36+5:302021-03-09T04:39:36+5:30
गडचिराेली : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण राेजगार हमी याेजनेची कामे सुरू झाल्याने नाेंदणीकृत मजुरांना दिलासा मिळाला आहे. गडचिराेली जिल्ह्यातील ...
गडचिराेली : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण राेजगार हमी याेजनेची कामे सुरू झाल्याने नाेंदणीकृत मजुरांना दिलासा मिळाला आहे. गडचिराेली जिल्ह्यातील एकूण ४५७ ग्रामपंचायतींपैकी ३२६ ग्रामपंचायतस्तरावर राेहयाेची विविध कामे सुरू असून, सध्या या कामांवर ५८ हजार ५८२ इतकी मजूर उपस्थिती आहे.
प्रत्येक नाेंदणीकृत मजुराला १०० दिवसांचा राेजगार देण्याची राेहयाेच्या कायद्यात तरतूद आहे. या कायद्याची व सदर याेजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या नरेगा विभागामार्फत नियाेजन केले जाते. जिल्ह्यात सध्या शेतीची फारशी कामे नाहीत. शिवाय जिल्ह्यात काेणतेही माेठे उद्याेगधंदे वा फॅक्टरी नसल्याने बेराेजगारांची संख्या माेठी आहे. काेराेना काळात अनेक मजूर बेराेजगार झाले. अशा काळात राेजगार हमी याेजनेच्या कामाने मजुरांना दिलासा मिळाला. सध्या ग्रामीण भागात राेहयाेची कामे जाेमात सुरू असल्याचे दिसून येते.
राेजगार हमी याेजनेअंतर्गत गडचिराेली जिल्हा परिषदेच्या नरेगा विभागाला शासनाच्या वतीने दरवर्षी राेहयाे कामाचे उद्दिष्ट दिले जाते. सन २०२०-२१ या वर्षात गडचिराेली जिल्ह्याने राेहयाेच्या कामात उद्दिष्टपूर्ती करीत ११४.२२ टक्क्यांवर मजल मारली आहे. अधिकाधिक ग्रामपंचायतींमध्ये कामे सुरू करून ५५ हजारांवर मजुरांना राेजगार देण्यात प्रशासन यशस्वी झाल्याचे दिसून येते.
राेहयाेच्या कामात आरमाेरी, धानाेरा तालुका आघाडीवर असून, सर्वांत कमी मजूर उपस्थिती एटापल्ली तालुक्यात आहे. मजूर उपस्थितीमध्ये त्या खालाेखाल भामरागड, एटापल्ली तालुक्याचा क्रमांक लागताे. सुगम भागातील गडचिराेली, देसाईगंज, कुरखेडा, चामाेर्शी या तालुक्यात राेहयाेची कामे सुरू असून, मजूर उपस्थितीही बऱ्यापैकी आहे. मार्च महिन्यात राेहयाेच्या कामावर मजुरांची उपस्थिती माेठी राहणार आहे. एप्रिल महिन्यात जिल्ह्यात तेंदूपत्ता संकलनाचे काम सुरू हाेण्याची शक्यता आहे. एप्रिल महिन्यापासून बरेच मजूर राेहयाेच्या कामाकडे पाठ फिरवितात.
बाॅक्स...
थेट बँक खात्यात मजुरीची रक्कम जमा
राेजगार हमी याेजनेंतर्गत कुशल व अकुशल अशा दाेन प्रकारची कामे केली जातात. कुशल कामामध्ये बांधकाम साहित्याचा समावेश हाेताे, तर अकुशल कामात मजुरांचा समावेश आहे. मजुरांच्या मजुरीची रक्कम थेट बँक खात्यात ऑनलाइन स्वरूपात जमा केली जाते. मजुरीची रक्कम मिळण्यास विलंब झाल्यास व्याजासहित रक्कम दिली जाते, तशी राेहयाेच्या कायद्यात तरतूद आहे. मजूर हजेरीचा ऑनलाइन डेटा सादर केला जाताे.
काेट...
जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात याेग्य नियाेजन करून या वर्षात राेहयाे कामांचे उद्दिष्ट गाठण्यात आले. पुढील वर्षीसुद्धा अधिकाधिक मजुरांना राेजगार देण्याचा प्रयत्न राहील.
- एम.एस. चव्हाण, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, राेहयाे
काेट...
काेराेना महामारीत ग्रामीण व शहरी भागातील कामे प्रभावित झाली. राेजगार हमी याेजनेची कामे गावात सुरू झाल्याने माझ्यासह अनेक मजूर कुटुंबांना काम मिळाले. गेल्या दाेन महिन्यांपासून मजगीच्या राेहयाे कामाने माेठा आधार मिळाला आहे.
- पांडुरंग कामडी,
राेहयाे कामगार