श्रमदानातून नारगुंडा मार्गाची दुरूस्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2017 01:37 AM2017-08-03T01:37:29+5:302017-08-03T01:38:42+5:30
तालुक्यातील नारगुंडाकडे मार्गांची प्रचंड दुरवस्था झाली होती. या मार्गावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे निर्माण झाले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
भामरागड : तालुक्यातील नारगुंडाकडे मार्गांची प्रचंड दुरवस्था झाली होती. या मार्गावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे निर्माण झाले होते. त्यामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या बसवाहतुकीसह खासगी वाहतुकही प्रभावित होत होती. नागरिकांची ही अडचण लक्षात घेऊन नारगुंडा पोलिसांनी सदर मार्गावरील खड्डे बुजवून या मार्गाची श्रमदानातून दुरूस्ती केली.
रस्त्याची दुरूस्ती न झाल्यास महामंडळाची बससेवा बंद करण्यात येईल, अशा सूचना बस चालकाकडून नागरिकांना मिळत होत्या. त्यानंतर नारगुंडा पोलीस मदत केंद्राचे पोलीस कर्मचारी व ग्रामस्थांनी मिळून श्रमदानातून या मार्गाची दुरूस्ती केली.
नारगुंडा पोलिसांनी एका हातात बंदुक व दुसºया हाता टिकास, फावडा व सब्बल घेऊन दिवसभर नारगुंडा-भामरागड मार्गावर श्रमदान केले. सुरक्षा व्यवस्था सांभाळण्यासह नारगुंडा पोलिसांनी सदर रस्त्याची दुरूस्ती केल्यामुळे वाहतुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. नागरिकांनीही नारगुंडा पोलिसांच्या या कामगिरीचे कौतुक केले आहे. यापूर्वी पोलिसांच्या पुढाकाराने अहेरी उपविभागातील अनेक रस्त्यांची दुरूस्ती श्रमदानातून केली आहे. मात्र रस्त्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्षच आहे.