सिरोंचा महामार्गाचे काम अपूर्णावस्थेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2018 12:43 AM2018-05-10T00:43:10+5:302018-05-10T00:43:56+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
सिरोंचा : तालुक्यात दोन राष्ट्रीय महामार्ग मंजूर करण्यात आले आहे. मात्र सदर दोन्ही मार्गाचे काम नियमितपणे सुरू राहून पूर्ण झालेले नाही. सिरोंचा-पातागुड्डम या महामार्गाचे काम गेल्या १५ वर्षांपासून कासवगतीने सुरू असून ते अपूर्णच आहे. त्यामुळे संबंधित यंत्रणेच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
दक्षिण गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा, अहेरी, एटापल्ली, भामरागड असे चार तालुके असून जिल्हा निर्मितीला ३६ वर्ष पूर्ण होऊनही हे चार तालुके अद्यापही अविकसीत आहेत. या तालुक्याला जोडणाऱ्या रस्त्याची बकाल अवस्था झाली आहे. आलापल्ली-सिरोंचा या राष्ट्रीय महामार्गाचे काम शासनाने मंजूर केले असून या संदर्भात माध्यमांनी वृत्तही प्रकाशित केले आहे. मात्र प्रत्यक्षात या मार्गाच्या कामाला अद्यापही सुरूवात झाली नाही. सिरोंचा-पातागुड्डम या महामार्गाची प्रचंड दुरवस्था झाली आहे. तेलंगणा सरकारकडून मेडिगट्टा प्रकल्पासाठी दररोज १०० ते १५० वाहनांची वर्दळ सुरू आहे. या वाहनांच्या वर्दळीमुळे सदर रस्त्याची पूर्णत: वाट लागली आहे. या संदर्भात संबंधित यंत्रणेकडे अथवा प्रशासनाकडे विचारणा केली असता, सकारात्मक उत्तर मिळत नसल्याचे दिसून येत आहे.
काम तत्काळ पूर्ण करा
सिरोंचा तालुक्यातील दोन राष्ट्रीय महामार्गाचे काम लवकर पूर्ण करण्यात यावे. आलापल्ली-सिरोंचा व सिरोंचा ते पातागुड्डम या मार्गाची निर्मिती करण्यात यावी, अशी मागणी आरडाचे उपसरपंच रंगू बापू उर्फ लक्ष्मय्या यांनी जिल्हाधिकाºयांकडे निवेदनातून केली आहे. अहेरी येथे समन्वय समितीच्या सभेत रस्ता कामाबाबत चर्चा करावी, असे त्यांनी म्हटले आहे.