नगरोत्थान योजनेतून पावणे दोन कोटींची कामे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2018 01:28 AM2018-04-07T01:28:15+5:302018-04-07T01:28:15+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : महाराष्ट्र नगरोत्थान महाअभियान योजना अंतर्गत गडचिरोली शहरातील ३८ रस्त्यांची कामे केली जाणार आहेत. या कामांसाठी १ कोटी ६७ लाख ४० हजार ५८० रूपयांचा निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. सदर कामे लवकरच सुरू होणार आहेत.
जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत २०१७-१८ या वित्तीय वर्षात जिल्ह्यातील नगर परिषद व नगर पंचायती यांच्यासाठी ९ कोटी ५० लाख रूपयांची अर्थसंकल्पीय तरतूद केली आहे. त्यापैकी गडचिरोली नगर परिषदेसाठी २ कोटी ७५ लाख ९० हजार रूपयांचा नियतव्यय मंजूर आहे. त्यापैकी १ कोटी ६७ लाख ४० हजार ५८० रूपयांच्या विकास कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
या निधीतून बहुतांश ठिकाणी सिमेंट काँक्रिटचे रस्ते व नालीचे बांधकाम केले जाणार आहे. यामध्ये धानोरा मार्ग ते दादू शेख यांच्या घरापर्यंत, सरदारे शिक्षक यांचे घर ते तलावाच्या पाटापर्यंत, कोडापे ते सोनपिपरे, बसमवार ते चुधरी यांच्या घरापर्यंत यांच्या घरापर्यंत सिमेंट काँक्रिटचा रस्ता व नाली बांधकाम.
ताराबाई पेंदाम ते उमाकांत बांबोळे, दहेगावकर ते भांडेकर, नितीन गेडाम ते चिंचोळकर यांच्या घरापर्यंत रस्ता, निमगडे ते कुत्तरमारे यांच्या घरापर्यंत नाली, प्रकाश बहिकर ते सातपुते, कमलेश खेवले ते रवी दाने यांच्या घरापर्यंत नाली, भांडेकर यांचे दुकान ते मनोहर मुल्लेवार यांच्या घरापर्यंत रस्ता खडीकरण व नाली बांधकाम, सुरेश कत्रोजवार ते प्रेमदास आलाम यांच्या घरापर्यंत रस्ता, मडावी ते मोतीराम बोबाटे यांच्या घरापर्यंत रस्ता, हजारे ते असाटी यांच्या घरापर्यंत नाली बांधकाम, निंबोरकर पान सेंटर ते येमोलवार यांच्या घरापर्यंत रस्ता, झाडे किराणा दुकान ते आकरे यांच्या घरापर्यंत नाली, दयाराम पोटे ते भास्कर मस्के यांच्या घरापर्यंत मार्ग, कांबळे ते मोहितकर यांच्या घरापर्यंत नाली, रामपुरी शाळा ते गोरे यांच्या घरापर्यंत रस्ता, विष्णू महाजन ते ताराबाई नेरकर यांच्या घरापर्यंत रस्ता, पेंदाम ते भोंगळे यांच्या घरापर्यंत नाली, धारणे ते चौधरी यांच्या घरापर्यंत नाली, विनोद काटवे ते रामदास हजारे यांच्या घरापर्यंत नाली व रस्ता खडीकरण, श्यामराव पिपरे ते मारोती भोयर यांच्या घरापर्यंत नाली, रामदास शेंडे ते बाबुराव शेंडे यांच्या घरापर्यंत नाली बांधकाम, गोरमाळा मार्ग ते हरी कुनघाडकर यांच्या घरापर्यंत खडीकरण, अमृत जुआरे यांच्या घराजवळ नालीचे बांधकाम होणार आहे. विसापूर कॉलनीतील उईके ते भुरसे यांच्या घरापर्यंत नाली व रोड, मुरतेली ते मोरदेवे, खेवले ते बांबोळे, मेश्राम ते जेवाते यांच्या घरापर्यंत खडीकरण केले जाणार आहे. डॉ. किलनाके ते देवगडे, फाये ते काळबांधे, तेलसे ते किरमोरे यांच्या घरापर्यंत रस्ता व नाली होणार आहे.
या ठिकाणी होणार भूमिगत गटार
पंकज गुड्डेवार ते दिलीप गोरे यांच्या घरापर्यंत, निरजाबाई नाथानी ते अलबअली पिरानी, अमिल अली ते आरमोरी मार्ग, डॉ. रूडे यांचा दवाखाना ते राजू चन्नावार यांच्या घरापर्यंत भूमिगत गटाराचे बांधकाम केले जाणार आहे. भूमिगत गटारांमधील गाळ वेळोवेळी उपसण्याची गरज राहत नाही. त्यामुळे भूमिगत गटार बांधण्याला नगर परिषदेने प्राधान्य दिले आहे.