उपसा सिंचन योजनांची कामे मार्गी लागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 11:37 PM2017-12-26T23:37:08+5:302017-12-26T23:37:50+5:30

गडचिरोली तालुक्यातील कोटगल आणि आरमोरी तालुक्यातील डोंगरगाव-ठाणेगाव उपसा सिंचन योजनांच्या कामांनी आता वेग घेतला आहे. गेली अनेक महिने पाटबंधारे विभागाकडे अधिकाऱ्यांची पदे रिक्त असल्यामुळे या योजनांची कामे रखडली होती.

Work on the upturn irrigation schemes will be needed | उपसा सिंचन योजनांची कामे मार्गी लागणार

उपसा सिंचन योजनांची कामे मार्गी लागणार

googlenewsNext
ठळक मुद्दे१५ गावांना सिंचनाची प्रतीक्षा : निधी असूनही अधिकाºयांअभावी रखडले होते काम

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गडचिरोली तालुक्यातील कोटगल आणि आरमोरी तालुक्यातील डोंगरगाव-ठाणेगाव उपसा सिंचन योजनांच्या कामांनी आता वेग घेतला आहे. गेली अनेक महिने पाटबंधारे विभागाकडे अधिकाऱ्यांची पदे रिक्त असल्यामुळे या योजनांची कामे रखडली होती. पण आता विविध कामे मार्गी लागली आहेत. या दोन्ही उपसा सिंचन योजनांमधून दोन्ही तालुक्यात १५ गावांना साडेपाच हजार हेक्टर क्षेत्राला सिंचन होणार आहे.
७८ टक्के वनक्षेत्राने व्यापलेल्या गडचिरोली जिल्ह्यात मोठे सिंचन प्रकल्प उभारणे शक्य नाही. त्यामुळे मध्यम प्रकारातील उपसा सिंचन योजना आणि लघुसिंचन प्रकल्पातून सिंचन क्षेत्र वाढविण्यासाठी १० वर्षांपूर्वी दोन उपसा सिंचन योजना आणि कुरखेडा तालुक्यातील येंगलखेडा येथे लघु पाटबंधारे प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली होती.
वैनगंगा नदीच्या तिरावर कोटगल गावाजवळ उभारल्या जात असलेल्या कोटगल उपसा सिंचन योजनेला ३० एप्रिल २००८ रोजी प्रशासकीय मान्यता देण्यात आली. या योजनेतून गडचिरोली तालुक्यातील कोटगल, नवेगाव, मुरखळा, पारडीकुपी, कन्हेरी, पूलखल, मुडझा बुज., मुडझा व इंदाळा या ९ गावातील ३००० हेक्टर क्षेत्राला सिंचनाला लाभ मिळणार आहे. ४०.३० कोटींच्या या योजनेवर आतापर्यंत २६.३१ कोटी रुपये खर्च झाले आहेत. या योजनेच्या पंपगृह व उर्ध्वनलिकेच्या बांधकामासाठी ५.९८ हेक्टर जमिनीची आवश्यकता होती. त्यापैकी ५.०२ हेक्टर खासगी जमीन सरळ खरेदीने संपादित करण्यात आली तर उर्वरित ०.९५ हेक्टर जमीन सरळ खरेदीने संपादन करण्याची कार्यवाही प्रगतीपथावर असल्याचे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले.
येंगलखेडा प्रकल्पाचे काम पूर्ण, कालवे प्रगतीपथावर
कुरखेडा तालुक्यातील येंगलखेडा गावाजवळ स्थानिक नाल्यावर बांधण्यात येत असलेल्या येंगलखेडा लघु पाटबंधारे प्रकल्पातून येंगलखेडा, चिचेवाडा, सावरगाव व नेहारपल्ली या ४ गावआंना सिंचनाला लाभ मिळणार आहे. या प्रकल्पाचे काम १०० टक्के झाले असले तरी कालव्यांची कामे व्हायची आहेत. उजवा व डाव्या कालव्याच्या बांधकामासाठी कार्यारंभ आदेश देण्यात आला आहे. डाव्या कालव्यासाठी वृक्षतोड करावी लागत आहे. या प्रकल्पात २०१४ मध्ये पाण्याचा साठा करण्यात आला आहे. भूसंपादनास जमीनधारकांनी केलेल्या विरोधामुळे प्रकल्पाचे काम रखडले आहे. याशिवाय नक्षलग्रस्त अतिसंवेदनशिल भाग असल्यामुळे काम करण्यास अडचणी येत आहेत. या प्रकल्पाकरिता अंदाजे ३३.८४ हेक्टर खासगी जमीनीची आवश्यकता आहे. त्यापैकी प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्राकरिता नलिकसा व दल्ली येथील २२.२२ हेक्टर खासगी जमीन संपादित करण्यात आली. उर्वरित ११.६२ हेक्टर जमिनीची संयुक्त मोजणी झाली असून येंगलखेडा येथील ३.२० हेक्टर खासगी जमीन सरळ खरेदीकरिता प्रस्तावित आहे. त्यासाठी दर निर्धारण प्रस्ताव जिल्हाधिकाºयांच्या मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे. उर्वरित ८.४२ हेक्टर जमिनीचे दर निर्धारण प्रस्ताव तयार करणे सुरू आहे.
२०१९-२० अखेर सिंचनाला सुरूवात
कोटगल योजनेसाठी २०१७-१८ मध्ये ७ कोटींची कामे तर २०१८-१९ मध्ये १० कोटींची कामे पूर्ण करून २०१९ मध्ये प्रत्यक्ष सिंचनाला सुरूवात करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच डोंगरगाव-ठाणेगाव योजनेसाठी २०१७-१८ मध्ये ३ कोटी, २०१८-१९ मध्ये ४ कोटी खर्चातून १००० हेक्टर तर २०१९-२० मध्ये ३ कोटी खर्चातून कामे पूर्ण करून २९५० हेक्टर क्षेत्राला सिंचनाची सुरूवात करण्याचे नियोजन गडचिरोली पाटबंधारे विभागाने केले असल्याची माहिती कार्यकारी अभियंता अविनाश मेश्राम यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
पंपगृहांचे काम प्रगतीपथावर
कोटगल उपसा सिंचन प्रकल्पाच्या पंपगृहाचे काम ९५ टक्के पूर्ण झाले आहे. उर्ध्वनलिकेचे २१०० मीटर लांबीचे पाईप टाकण्याचे काम झालेले असून उर्वरित कामे प्रगतीपथावर आहे. स्वीच यार्डमध्ये माती भरण्याचे काम चालू आहे. बंद नलिका वितरण प्रणालीचे अंदाजपत्रकाचे काम सुरू आहे.
डोंगरगाव-ठाणेगाव उपसा सिंचन प्रकल्पाच्या पंपगृहाचे बांधकाम ४० टक्के पूर्ण झाले आहे. उर्ध्वनलिकेच्या भूसंपादनाअभावी पाईप बसविण्याचे काम प्रलंबित आहे. जून २०१९ अखेर ही योजना पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

Web Title: Work on the upturn irrigation schemes will be needed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.