कार्यकर्ताच भाजपचा मालक
By admin | Published: July 9, 2016 01:40 AM2016-07-09T01:40:39+5:302016-07-09T01:40:39+5:30
पंडित दीनदयालजी उपाध्याय प्रशिक्षण महाअभियानांतर्गत विदर्भाची काशी असलेल्या मार्र्कंडादेव येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने ...
उपेंद्र कोठेकर यांचे प्रतिपादन : मार्कंडा येथे कार्यकर्ता प्रशिक्षणाचा दुसरा दिवस
मार्कंडादेव : पंडित दीनदयालजी उपाध्याय प्रशिक्षण महाअभियानांतर्गत विदर्भाची काशी असलेल्या मार्र्कंडादेव येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने गुरूवारपासून तीन दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर प्रारंभ झाले. या शिबिराचे उद्घाटन गुरूवारी भाजपचे विदर्भ संघटन मंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर यांच्या हस्ते झाले. शुक्रवारीही या प्रशिक्षण वर्गात भाजप कार्यकर्त्यांना तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या लोकप्रतिनिधींना विविध विषयावर माहिती देण्यात आली.
याप्रसंगी बोलताना डॉ. उपेंद्र कोठेकर म्हणाले की, देशातील इतर पक्ष हे व्यक्तीवर आधारित आहे. मात्र भारतीय जनता पक्षाचा मालक हा कार्यकर्ता असून हा कार्यकर्ता माहिती तंत्रज्ञानाच्या युगात परिपूर्ण असला पाहिजे, त्यालाही कौशल्य विकासाचे ज्ञान असले पाहिजे, असे प्रतिपादन केले. यावेळी राज्य व केंद्र सरकारच्या विविध लोकाभिमूख योजनांच्या माहितीचा पाढा त्यांनी वाचला. या तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमात आरमोरी विधानसभा क्षेत्रातून रामभाऊ लांजेवार, नगरसेविका दिपाली देशमुख, स्वाती नंदनवार, शशिकांत साळवे, चांगदेव फाये, विलास गावंडे, वेणुताई ढवगाये, नंदिनी दखणे, पंकज खरवडे, सुनीता ठेंगरी, चामोर्शी पंचायत समितीच्या सभापती शशिबाई चिळंगे, उपसभापती मंदा दुधबावरे, ज्येष्ठ नेते बंडू चिळंगे, तिन्ही विधानसभा क्षेत्रातून जि. प. सदस्य यशवंत धुळसे, धर्मप्रकाश कुकूडकर, दामोधर अरगेलवार, माधव कासर्लावार, विनोद वरगंटीवार, केशव भांडेकर, नामदेव सोनटक्के, नीरज रामानुजमवार, आनंद भांडेकर, अशोक पोरेड्डीवार, मनमोहन बंडावार, राजेश्वर चुधरी, विजय गेडाम, प्रशांत येगलोपवार, नगरसेविका रोशणी वरघंटे, मीनल पालारपवार, कविता किरमे, माधवी पेशट्टीवार, दिलीप चलाख, ज्ञानेश्वर कुनघाडकर, रमेश अधिकारी, राजू वरघंटीवार, माणिक कोहळे, नरेश अलसावार आदी उपस्थित आहेत. (वार्ताहर)