कामगारांनो, संघटित व्हा!
By Admin | Published: December 31, 2016 02:32 AM2016-12-31T02:32:38+5:302016-12-31T02:32:38+5:30
बांधकाम कामगारांचे जीवनमान उंचाविण्यासाठी व त्यांना सामाजिक सुरक्षा देण्यासाठी महाराष्ट्र इमारत
संजय मंडवघटे यांचे आवाहन : आरमोरीत बांधकाम कामगारांचा मेळावा
आरमोरी : बांधकाम कामगारांचे जीवनमान उंचाविण्यासाठी व त्यांना सामाजिक सुरक्षा देण्यासाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ कार्यरत आहे. मात्र लाखो बांधकाम कामगार यात नोंदणी न करता लाभापासून वंचित आहेत. त्यामुळे सर्व खऱ्या बांधकाम कामगारांनी या मंडळात नोंदणी करून लाभ मिळण्यासाठी व हक्कांसाठी लढा देण्यासाठी संघटित व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना फेडरेशनचे महासचिव संजय मंडवघटे यांनी केले.
आरमोरी येथील टिळक चौकातील दुर्गा मंदिर देवस्थानात आयोजित बांधकाम कामगाराच्या मेळाव्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी कामगार नेते डॉ. महेश कोपुलवार होते. प्रमुख अतिथी म्हणून माजी जि. प. सदस्य अमोल मारकवार, आयटकचे विनोद झोडगे, अॅड. जगदीश मेश्राम, चंद्रभान मेश्राम, देवराव चवळे, भगवान चुधरी उपस्थित होते.
१९९६ मध्ये बांधकाम कामगारांसाठी कायदा झाला असून महाराष्ट्रात १ मे २०११ मध्ये मंडळ स्थापन झाले. मात्र त्याची अंमलबजावणी करण्यासह महाराष्ट्र शासन उदासीन आहे. एकही बांधकाम कामगार नोंदणी व लाभापासून वंचित राहू नये, असे सांगत सर्व बांधकाम कामगारांनी नावाची नोंदणी करावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले. दरम्यान महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार संघटना (आयटक) ची तालुका कार्यकारिणी गठित करण्यात आली.
यामध्ये अध्यक्षपदी ऋषी शास्त्रकार, उपाध्यक्ष पुंडलिक घोडाम, देवेंद्र राऊत, सचिव गुणाजी खरकाटे, सहसचिव प्रकाश चापले, क्षीरसागर, सोनकुसरे, कोषाध्यक्ष पुरूषोत्तम जौजाळकर, सल्लागार डॉ. महेश कापुलवार, अॅड. जगदीश मेश्राम तर सदस्यपदी दामोदर चिलबुले, नानाजी राऊत, दिवाकर गरमळे, तुळशिदास ठाकरे, तांबट शहा, सुरेश सोरते, बबन शिलार, देवराव धाडसे, भास्कर बावणे, कालिदास चौके, लालाजी बावणे, अशोक गेडाम, बबन कुनघाडकर, राकेश मेश्राम, सुरेश सोनटक्के, रवींद्र बावणे यांची निवड करण्यात आली. (शहर प्रतिनिधी)