कार्यकर्त्यांनी शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवाव्या
By admin | Published: December 28, 2015 01:39 AM2015-12-28T01:39:09+5:302015-12-28T01:39:09+5:30
केंद्र व राज्य शासनाच्या वतीने अनेक लोककल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत.
खासदारांचे प्रतिपादन : आलापल्ली येथे प्रशिक्षण वर्ग
अहेरी : केंद्र व राज्य शासनाच्या वतीने अनेक लोककल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांची माहिती गोरगरीब नागरिकांपर्यंत पोहोचवावी, असे आवाहन खासदार अशोक नेते यांनी केले.
आलापल्ली येथील राम मंदिरात पंडीत दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियानाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षण वर्गाचा समारोप शुक्रवारी करण्यात आला याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम, भाजपा जिल्हाध्यक्ष किसन नागदेवे, अहेरी विधानसभा प्रमुख बाबुराव कोहळे, प्रशिक्षण प्रमुख प्रकाश गेडाम, भाजपा किसान मोर्चा सदस्य रमेश भुरसे, जिल्हा उपाध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रवींद्र ओल्लालवार, प्रकाश दत्ता, अहेरी तालुका अध्यक्ष विनोद अकनपल्लीवार, दामोधर अरिगेला, अब्बास शेख, जिल्हा परिषद महिला व बाल कल्याण सभापती सुवर्णा खरवडे, भामरागड पंचायत समितीच्या सभापती रंजना उईके, सिरोंचा तालुकाध्यक्ष संदीप राचर्लावार एटापल्ली तालुकाध्यक्ष बाबुराव गंप्पावार, सुभाष गणपती, सुनील बिश्वास, एटापल्ली पंचायत समिती सभापती दीपक फुलसंगे आदी उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम म्हणाले की, पक्ष संघटनेसाठी झटणारा सर्वसामान्य कार्यकर्ता हाच खरा पक्ष व जनता यांच्यामधील महत्त्वाचा दूवा आहे. कार्यकर्त्यांनी पक्षाची ध्येयधोरणे, शासनाच्या योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम प्रामाणिकपणे केले पाहिजे, असे प्रतिपादन अम्ब्रीशराव आत्राम यांनी केले.
दिवसभर चाललेल्या या प्रशिक्षणात पक्ष संघटन, सरकार, शासनाच्या जनहितकारी योजना माध्यमे आदी अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली.
संचालन भारतीय जनता पार्टी अहेरी तालुका महामंत्री सतीश गोटमवार तर आभार रमेश समुद्रालवार यांनी मानले. प्रशिक्षणाला अहेरी, मुलचेरा, सिरोंचा, भामरागड, एटापल्ली तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)