लैंगिक सुरक्षिततेवर कार्यशाळा
By Admin | Published: October 6, 2016 02:21 AM2016-10-06T02:21:16+5:302016-10-06T02:21:16+5:30
महात्मा गांधी कला, विज्ञान व स्व. न. पं. वाणिज्य महाविद्यालय आरमोरी येथे प्राचार्य डॉ. लालसिंग खालसा यांच्या मार्गदर्शनात
आरमोरीत कार्यक्रम : विद्यार्थिनींना कायद्याविषयी दिली माहिती
आरमोरी : महात्मा गांधी कला, विज्ञान व स्व. न. पं. वाणिज्य महाविद्यालय आरमोरी येथे प्राचार्य डॉ. लालसिंग खालसा यांच्या मार्गदर्शनात महिला सुरक्षा व विकास समिती आणि राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांचा लैंगिक अत्याचार व सुरक्षितता या विषयावर कार्यशाळेचे आयोजन मंगळवारी करण्यात आले.
कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य डॉ. नरेश ठोंबरे, प्रमुख मार्गदर्शक म्हणून पीएसआय शीतल राणे, भावना प्रधान, प्रा. डॉ. अमिता बन्नोरे, प्रा. डॉ. विशाखा वंजारी, प्रा. सीमा नागदेवे, प्रा. कविता खोब्रागडे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना पीएसआय शीतल राणे यांनी विनयभंग, छेडखानी, इशारे करणे, हातभाव करणे, कॉमेन्टस करणे या समस्या कशा हाताळाव्या व स्वत:ची सुरक्षितता कशी करावी, हे व्हिडीओ, अॅडिओ क्लिपच्या माध्यमातून समजावून सांगितले. बालकांचा लैंगिक छळ, पास्कोअॅक्ट महिला गुन्ह्याच्या कायद्याबाबत झालेली सुधारणा याबाबत माहिती देऊन संकटकालीन प्रतिवाद अॅप कसा चालवावा याविषयी मार्गदर्शन केले. उपस्थितांचे आभार प्रा. कविता खोब्रागडे यांनी मानले. यशस्वीतेसाठी प्रा. प्रणाली गारोदे, शीला घोडीचौरे, प्रशांत दडमल, सचिन काळबांधे यांच्यासह विद्यार्थ्यांनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)