जागतिक पर्यावरणदिनी चकाकले आलापल्लीचे ‘ग्लाेरी ऑफ फाॅरेस्ट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2022 05:00 AM2022-06-06T05:00:00+5:302022-06-06T05:00:24+5:30

कार्यक्रमाला आलापल्लीचे सहायक वनसंरक्षक नितेश देवगडे, मिरकलचे गाव प्रमुख करपा कुळमेथे, गाव पाटील डोबी गावडे व आलापल्लीचे वनपरिक्षेत्र अधिकारी योगेश शेरेकर आदी उपस्थित होते. दरम्यान, नितेश देवगडे यांनी कर्मचारी व ग्रामस्थांना पर्यावरण चळवळीचा इतिहास सांगून पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व उपस्थित नागरिकांना पटवून दिले. तसेच पर्यावरण संवर्धनाकरिता जीवसृष्टीमध्ये प्रत्येक जीव महत्त्वाचा असून, पर्यावरण संरक्षणाकरिता प्रत्येक नागरिकांनी याेगदान देणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले.

World Environment Day glittering Alapally's 'Gallery of Forest' | जागतिक पर्यावरणदिनी चकाकले आलापल्लीचे ‘ग्लाेरी ऑफ फाॅरेस्ट’

जागतिक पर्यावरणदिनी चकाकले आलापल्लीचे ‘ग्लाेरी ऑफ फाॅरेस्ट’

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क
आलापल्ली : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आलापल्ली वनपरिक्षेत्रात सायकल रॅलीसह विविध उपक्रम राबविण्यात आले. ग्लाेरी ऑफ फाॅरेस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आलापल्ली येथे वनपरिक्षेत्र कार्यालय व मिरकलवासीयांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता अभियान राबवून परिसर चकाचक करण्यात आला, तर मिरकल तलावातही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. ह्या कार्यक्रमात  ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाला आलापल्लीचे सहायक वनसंरक्षक नितेश देवगडे, मिरकलचे गाव प्रमुख करपा कुळमेथे, गाव पाटील डोबी गावडे व आलापल्लीचे वनपरिक्षेत्र अधिकारी योगेश शेरेकर आदी उपस्थित होते. दरम्यान, नितेश देवगडे यांनी कर्मचारी व ग्रामस्थांना पर्यावरण चळवळीचा इतिहास सांगून पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व उपस्थित नागरिकांना पटवून दिले. तसेच पर्यावरण संवर्धनाकरिता जीवसृष्टीमध्ये प्रत्येक जीव महत्त्वाचा असून, पर्यावरण संरक्षणाकरिता प्रत्येक नागरिकांनी याेगदान देणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन झिमेलाचे क्षेत्र सहायक मोहन भोयर, तर आभार विशेष सेवा वनपाल पूनमचंद  बुद्धावार यांनी मानले. दरम्यान, वनपरिक्षेत्र कार्यालय ते ग्लोरी ऑफ आलापल्लीपर्यंत १६ किमी लांब मोटारसायकल रॅली काढण्यात आली. सदर रॅलीव्दारे तलवाडा व मिरकल गावात वनसंरक्षण व पर्यावरणविषयी जनजागृती करून वृक्षाराेपण करण्यात आले. उपक्रमांच्या यशस्वीतेसाठी वनपाल अनिल झाडे, ऋषिदेव तावाडे,  रेखा किरमिरे, वनरक्षक  देवानंद कचलामी, दामोदर चिव्हाणे, सचिन जाभुळे, ऋषी मडावी, चंद्रकांत सडमेक,  संतोष चव्हाण, बक्का कुळमेथे, महेंद्र येलीचपूरवार, साहिल झाडे, लक्ष्मी नान्हे, वंदना कोडापे,  वनमजूर बंडू रामगिरवार, निखिल गड्डमवार, वाहनचालक सचिन डांगरे व नागरिकांनी सहकार्य केले.

पहिल्यांदाच सहभागाने मिरकलवासी भारावले
वनविभागाच्या वतीने सदर अभियानात गावकऱ्यांना प्रथमच सामावून घेतल्याबद्दल ग्रामस्थांना पर्यावरणाचे महत्त्व कळले असून, मिरकलवासीय तथा वनविभागाचे नाते असेच दृढ होत गेल्यास ‘ग्लोरी ऑफ आलापल्ली’ येथील पर्यटनाचा विकास होऊन स्थानिकांना काही प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल, असा आशावाद करपा कुळमेथे यांनी व्यक्त केला. वनविभागाने उपक्रमात सहभागी केल्याबद्दल मिरकलवासी भारावले.

 

Web Title: World Environment Day glittering Alapally's 'Gallery of Forest'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.