जागतिक आदिवासी दिन; डोंग्याने नदी ओलांडून २ कि.मी. पायी चालत आरोग्य कर्मचारी गेले गावात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2020 09:20 PM2020-08-10T21:20:01+5:302020-08-10T21:20:28+5:30
जागतिक आदिवासी दिनानिमित्त (९ ऑगस्ट) प्राथमिक आरोग्य केंद्र तोडसाअंतर्गत उपकेंद्र मवेली येथील नदीपलीकडील कुदरी गावाला तोडसाचे वैघकीय अधिकारी डॉ. राकेश नागोशे व आरोग्य कर्मचारी यांनी गावात जाऊन गावकऱ्यांची आरोग्य तपासणी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली: जागतिक आदिवासी दिनानिमित्त (९ ऑगस्ट) प्राथमिक आरोग्य केंद्र तोडसाअंतर्गत उपकेंद्र मवेली येथील नदीपलीकडील कुदरी गावाला तोडसाचे वैघकीय अधिकारी डॉ. राकेश नागोशे व आरोग्य कर्मचारी यांनी गावात जाऊन गावकऱ्यांची आरोग्य तपासणी केली.
पावसाळ्यात कुदरी मोहुर्ली हेटळकसा ही तिन्ही गावे नदीपलीकडे असल्याने संपर्क तुटल्याने तेथे पोहचण्यास कसरत करावी लागते. गावकऱ्यांनी बनविलेल्या गावठाण डोंग्याने नदी ओलांडून तसेच २ किमी पायी प्रवास करुन आरोग्य कर्मचारी गावात गेले.
शेतात हंगाम करणारे नागरिक पोलो साजरा करत असल्याने गावातील सर्व लोकसंख्या तपासणी होईल या उद्देशाने गावाला भेट देण्यात आली. आज कुदरी येथील १० गरोदर मातांची आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यापैकी २ गरोदर मातांमधे तीव्र रक्तक्षयाची लक्षणे आढळल्याने त्यांना त्वरीत रक्त चढविण्याकरीता अहेरी उपजिल्हा रुग्णालय येथे नेण्याच्या सुचना आरोग्य कर्मचाºयांना देण्यात आल्या. तसेच गरोदर मातांना नियमित आहाराबाबत व संस्थेत प्रसुती करण्याकरीता समुपदेशन करण्यात आले. अंगणवाडीतील बालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली व ज्येष्ठ नागरिकांच्या बिपी, शुगर, मुख कर्करोग तपासणी करुन आरोग्य सल्ले देण्यात आले. सोबत आरोग्य सेवक गजानन वावरे उपस्थित होते.