‘जगा आणि जगू द्या’च्या नाऱ्याने दुमदुमले शहर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2018 12:07 AM2018-03-30T00:07:28+5:302018-03-30T00:07:28+5:30

ज्ञान, दर्शन, चारित्र्य, अहिंसा, शांती, जगा आणि जगू द्या, अपरिग्रह यांची सबंध जगाला शिकवण देणारे जैन संप्रदायाचे २४ वे तिर्थंकर भगवान महावीरस्वामींचा जन्मकल्याणक महोत्सव गुरूवारी गडचिरोली येथे शांततेत पार पडला.

The world's twinkle of 'Live and Live' | ‘जगा आणि जगू द्या’च्या नाऱ्याने दुमदुमले शहर

‘जगा आणि जगू द्या’च्या नाऱ्याने दुमदुमले शहर

googlenewsNext
ठळक मुद्देशेकडो भाविकांचा सहभाग : भगवान महावीर जन्मकल्याणक उत्सव

ऑनलाईन लोकमत
गडचिरोली : ज्ञान, दर्शन, चारित्र्य, अहिंसा, शांती, जगा आणि जगू द्या, अपरिग्रह यांची सबंध जगाला शिकवण देणारे जैन संप्रदायाचे २४ वे तिर्थंकर भगवान महावीरस्वामींचा जन्मकल्याणक महोत्सव गुरूवारी गडचिरोली येथे शांततेत पार पडला.
गडचिरोली शहर, आरमोरी, चामोर्शी, व्याहाड परिसरातील सकल जैन समाजाच्या बंधूभगिनींनी स्थानिक मुख्य मार्गावरील साई मंदिरापासून सकाळी ७ वाजता भगवान महावीरांचा शांततेचा संदेश देणारी मिरवणूक शहराच्या मुख्य मार्गावरून काढण्यात आली. या मिरवणुकीत सर्व समाजाच्या बंधूभगिनी तसेच बालगोपाल मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मिरवणुकीदरम्यान भगवान महावीरांच्या माता-पित्यांची वेशभूषा परिधान केलेल्या लहान मुला-मुलींनी आकर्षक देखावे साकारले होते.
या उपक्रमास शहरवासीयांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. भगवान महावीरांचा संदेश देणारी मिरवणूक चामोर्शी मार्गावरील साई मंदिरात पोहोचली. या मिरवणुकीदरम्यान माहेश्वरी, गुजराती व राजस्थानी समाजातर्फे थंडपाणी व अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती.
मिरवणूक साई मंदिरात आल्यानंतर तिथे आयोजित कार्यक्रमात भगवान महावीरांच्या जन्मापूर्वी त्यांची माता त्रिशलादेवी यांना पडलेल्या शुभसूचक १४ स्वप्नांवरील नाटिका बालगोपाल व महिलांद्वारे सादर करण्यात आली. या दरम्यान मुरखळा येथील मुकबधिर व अपंग शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी सहभोजनाचा कार्यक्रम सकल जैन समाजातर्फे आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गडचिरोली, आरमोरी, चामोर्शी, व्याहाड येथील सकल जैन समाजाच्या बांधवांनी सहकार्य केले.

Web Title: The world's twinkle of 'Live and Live'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.