शेतकºयांच्या जखमेवर मीठ चोळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 12:21 AM2017-10-26T00:21:00+5:302017-10-26T00:21:10+5:30

महाराष्टÑ शासनाने दिवाळीपूर्वी कर्जमाफीच्७७ाी रक्कम शेतकºयांच्या खात्यात जमा करण्याची घोषणा केली.

On the wounds of farmers, salt was rubbed | शेतकºयांच्या जखमेवर मीठ चोळले

शेतकºयांच्या जखमेवर मीठ चोळले

Next
ठळक मुद्देवडेट्टीवारांची घणाघाती टीका : चामोर्शीत शेतकºयांचा मोर्चा, कर्जमाफी फसवी असल्याची टीका

लोकमत न्यूज नेटवर्क
चामोर्शी : महाराष्टÑ शासनाने दिवाळीपूर्वी कर्जमाफीच्७७ाी रक्कम शेतकºयांच्या खात्यात जमा करण्याची घोषणा केली. पण कोणाच्याही खात्यात रक्कम जमा न झाल्याने शेतकºयांची दिवाळी अंधारात गेली. कर्जमाफीची फसवी घोषणा करून शासनाने शेतकºयांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले. क्षमता नसेल तर नाही म्हणून सांगायचे असते. आता हिच जनता सरकार उलथवून टाकल्याशिवाय राहणार नाही, असा सज्जड इशारा महाराष्टÑ प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष तथा विधानसभेचे उपगटनेता आ.विजय वडेट्टीवार यांनी चामोर्शी येथील विराट मोर्चासमोर बोलताना दिला.
गडचिरोली जिल्हा व चामोर्शी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने बुधवारी दुपारी १२ वाजता चामोर्शी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर विविध मागण्यांसाठी धडक मोर्चा काढण्यात आला. मोर्चाचे नेतृत्त्व आमदार विजय वडेट्टीवार, माजी खासदार मारोतराव कोवासे, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आ.डॉ. नामदेव उसेंडी, अ‍ॅड.राम मेश्राम यांनी केले.
या मोर्चामध्ये लोकसभा जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, जि.प. सदस्य कविता भगत, रूपाली पंदीलवार, संजय चरडुके, जिल्हा उपाध्यक्ष राजेश ठाकूर, तालुकाध्यक्ष निशांत नैताम, नगर पंचायत उपाध्यक्ष राहूल नैैताम आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
मोर्चाच्या यशस्वीतेसाठी माजी पं.स. सदस्य प्रमोद भगत, न.पं.सभापती विजय शातलवार, सुमेध तुरे, माणिकराव तुरे, नगरसेवक वैभव भिवापुरे, अविनाश चौधरी, मंदा सरपे, प्रज्ञा उराडे, पं. स. सदस्य धर्मशीला सहारे, चामोर्शी महिला आघाडी प्रमुख दिप्ती ताफाली, विनोद खोबे, सुरेश भांडेकर, नीलकंठ निखाडे, गडचिरोलीचे नगरसेवक सतीश विधाते, जिल्हा कोषाध्यक्ष प्रज्ञा वासेकर, नाना पसपुलवार, टी.टी. मसराम, मोटघरे, अ‍ॅड.रामदास कुनघाडकर, संजय पंदिलवार, शंकर मारशेट्टीवार, ग्रा.पं. सदस्य माया ठाकूर, श्रावण दुधबावरे, माजी पं. स. सभापती रामभाऊ मानापुरे, पीतांबर वासेकर, मारेश्वर ऐडलावार, माणिकराव तुरे, अशोक तिवारी, संजय वडेट्टीवार, नानू उपाध्ये, गंगाधर पोटवार, शंकर सालोटकर, अविनाश चलाख, लोकेश शातलवार, संतोष भांडेकर, नंदू वाईलकर यांच्यासह बहुसंख्य शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार, युवक काँग्रेसचे कार्यकर्ते आदींनी सहकार्य केले.
या मोर्चानंतर विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. त्यात प्रामुख्याने पेट्रोल व डिझेलची दरवाढ कमी करण्यात यावी, गरीब, शेतकरी, शेतमजुरांना स्वस्त धान्य दुकानदारांना साखर, केरोसीन व डाळ आदी साहित्याचा पुरवठा करण्यात यावा, संजय गांधी, श्रावण बाळ योजनेचे मानधन एक हजार रूपये करण्यात यावे, चामोर्शी उपजिल्हा रूग्णालयाचे काम त्वरित सुरू करावे, महागाईला आळा घालण्यात यावा, धानाला प्रतिक्विंटल ४ हजार ५०० रूपये भाव देण्यात यावा अशा अनेक मागण्यांचा समावेश होता.

बैलबंड्यांसह धानाच्या पेंड्याही मोर्चात
काँग्रेसच्या या मोर्चात बैलबंड्यांसह शेतकºयांची उपस्थिती लक्षणिय होती. धान पिकाला लागलेल्या किडीसह धानाच्या पेंड्या, ढोलताशे व सरकारच्या निषेधार्थ विविध घोषणा दिल्या जात होत्या. हा मोर्चा एसडिओ कार्यालयावर धडकला. तिथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते.
या सभेत प्रमोद भगत, गंगाधर पोटवार या शेतकºयांनी आपल्या व्यथा मांडल्या. मारोतराव कोवासे, अ‍ॅड.राम मेश्राम, महेंद्र ब्राम्हणवाडे, डॉ. नामदेव उसेंडी यांनी आपल्या भाषणातून चांगलीच फटकेबाजी केली. सभेचे संचालन राजेश ठाकूर, प्रास्ताविक निशांत नैताम यांनी तर आभार सुरेश भांडेकर यांनी मानले.

शेतकºयांना वेठीस धरणारा हा कोणता न्याय?
सरकार गरीबांना केवळ मारण्याचे काम करीत आहे. कर्जमाफी देतो म्हणताना प्रत्यक्षात कुणालाही दिली नाही. धानाची रक्कम चेकने देणार, त्यावर जीएसटी लावणार आणि वरून तो चेक आधी कर्ज खात्यात जमा करणार हा कोणता न्याय आहे? असा सवाल यावेळी माजी खा.मारोतराव कोवासे यांनी आपल्या भाषणात केला.
माजी आ.डॉ.नामदेव उसेंडी म्हणाले, जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलच्या किमती ६० टक्केपर्यंत उतरल्या असताना पेट्रोल-डिझेलचे भाव कमी होत नाही. निराधार योजनेचा लाभ सरकारने बंद केला. ओबीसी, एससी, एसटीच्या शिष्यवृत्ती ३ वर्षांपासून विद्यार्थ्यांना मिळाल्या नाही.

Web Title: On the wounds of farmers, salt was rubbed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.