जीर्ण इमारतीचे निर्लेखन करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 01:26 AM2019-01-28T01:26:08+5:302019-01-28T01:26:49+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोरची : कोचीनारा येथील जि. प. शाळेतील एक इमारत जीर्णावस्थेत आहे. ती केव्हाही कोसळून अपघात होण्याची ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोरची : कोचीनारा येथील जि. प. शाळेतील एक इमारत जीर्णावस्थेत आहे. ती केव्हाही कोसळून अपघात होण्याची शक्यता आहे. सदर इमारतीचे निर्लेखन करून नव्याने बांधकाम करावे, या मागणीसाठी गावातील नागरिकांच्या वतीने शुक्रवारी ठिया आंदोलन करण्यात आले. परंतु अधिकाऱ्यांनी भेट देऊन आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.
कोरचीनारा येथील इमारतीचे निर्लेखन करण्याबाबत सन २०१५-१६ मध्ये गटशिक्षणाधिकाºयांना ग्रामस्थांच्या वतीने निवेदन देण्यात आले होते. दरम्यान शाळेला कुलूप ठोकून तीन दिवस शाळा बंद ठेवण्यात आली होती. याही वेळी अधिकाºयांनी केवळ आश्वासनच दिले. परंतु ते पूर्ण केले नाही. शाळेतील विद्यार्थी या परिसरात नेहमी खेळत असतात. त्यांना धोका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सदर इमारत निर्लेखित करून पाडण्यात यावी, अशी मागणी भ्रष्टाचार निवारण समितीचे पदाधिकारी व कोचीनारा येथील नागरिकांनी केली होती. त्यानंतर २०१७ मध्ये संवर्ग विकास अधिकाºयांना निवेदन दिले होते. २६ डिसेंबर २०१८ ला निवेदन देऊन २४ जानेवारी २०१९ पर्यंत इमारतीचे निर्लेखन करावे, अन्यथा २५ जानेवारीला आंदोलन करण्यात येईल, असा इशारा समितीतर्फे देण्यात आला होता. त्यानुसार शुक्रवारी बीएसएनएल कार्यालयाजवळ चक्काजाम आंदोलन करण्यात आले. अधिकाºयांनी इमारतीचे निर्लेेखन केले जाईल, असे आश्वासन आंदोलनकर्त्यांना दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. याप्रसंगी बीडीओ एस. आर. टिचकुले, बीईओ आबाजी आत्राम, पोलीस प्रभारी अधिकारी गोरखनाथ दहिफडे, पीएसआय महेश कोंडुभैैरी, आनंद श्रीमंगल उपस्थित होते.
या आंदोलनात समितीचे जिल्हा अध्यक्ष प्रमोद देवीकार, आयेशा अली, जितेंद्र सहारे, आशिष अग्रवाल, राहुल अंबादे, श्याम यादव, सिद्धू राऊत, वसीम शेख, अनिल नंदेश्वर, चेतन कराडे, बंटी जनबंधू, अभिजित निंबेकर तथा सदस्य धम्मदीप लाडे, चंदू वालदे, राकेश वर्मा, भुमेश शेंडे, रवी जनबंधू, सोरदे, कैलाश राजपुरोहित व नागरिक हजर होते.