सर्वच माध्यमिक शाळांनी पाठविले दहावीचे मूल्यांकन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:25 AM2021-07-15T04:25:54+5:302021-07-15T04:25:54+5:30
परीक्षा मंडळाने ठरवून दिलेल्या निकषाप्रमाणे शाळांना दहावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करून त्याचा अहवाल ४ जुलैपर्यंत शिक्षण मंडळाकडे सादर करायचा हाेता. ...
परीक्षा मंडळाने ठरवून दिलेल्या निकषाप्रमाणे शाळांना दहावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करून त्याचा अहवाल ४ जुलैपर्यंत शिक्षण मंडळाकडे सादर करायचा हाेता. याबाबतची मुदत ४ जुलै २०२१ हाेती. इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यांकन नेमके कसे करायचे, यासाठी बाेर्डाने एक परिपत्रक तयार करून ते सर्व शाळांना पाठविले हाेते. सुरुवातीला बहुतांश शाळांनी परिपत्रकाचे याेग्यरीत्या वाचन करून त्यातील मुद्दे समजून घेतले. त्यानुसार ८० गुणांचे मूल्यांकन केले.
काेट ....
आमच्या शाळेतील शिक्षकांनी दहावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करताना बाेर्डाने दिलेल्या परिपत्रकाचे विस्तृत व काळजीपूर्वक वाचन करून निकाल तयार केला. मूल्यांकनाचा अहवाल बाेर्डाकडे सादर केला असून, त्यात बाेर्डाने कुठल्याही त्रुटी काढल्या नाहीत. परिपत्रकानुसार निकाल सादर करण्यात आला आहे. - हेमंत रामटेके, प्राचार्य, शिवाजी हायस्कूल, गाेकुलनगर, गडचिराेली.
काेट ....
दहावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यांकन शाळांनी कसे करावे, यासाठी बाेर्डाने एक परिपत्रक तयार करून पाठविले हाेते. हे परिपत्रक सर्व शिक्षकांना नीट समजावून सांगितले. निकाल तयार करताना काही त्रुटी आल्यास वेळीच संबंधित व्यक्तीशी बाेलून निरसन केले. त्यामुळे आमच्या शाळेच्या निकालात कुठल्याच त्रुटी आढळल्या नाहीत. - लीना हकीम, प्राचार्य, भगवंतराव हिंदी हायस्कूल गडचिराेली.
काेट ...
दहावीच्या परीक्षा रद्द झाल्यानंतर शाळांच्या शिक्षकांकडून विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करून घेण्याची जबाबदारी बाेर्डाने मुख्याध्यापक व प्राचार्यांकडे साेपविली. दिलेल्या मुदतीत सर्व शाळांच्या मूल्यांकनाचा अहवाल तयार व्हावा, यासाठी आपण सातत्याने आढावा घेतला. मुख्याध्यापक व शिक्षकांच्या बैठका घेऊन मार्गदर्शन केले. त्यामुळे जिल्ह्यातील २५५ माध्यमिक शाळांनी वेळेत मूल्यांकन करून त्याचा अहवाल बाेर्डाकडे सादर केला. यासाठी तंत्रस्नेही शिक्षकांची मदत घेण्यात आली. - आर. पी. निकम, माध्यमिक शिक्षणाधिकारी, गडचिराेली.