येलचिलच्या जंगलात वणवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2019 12:51 AM2019-03-30T00:51:03+5:302019-03-30T00:51:29+5:30
तालुक्यातील येलचिलच्या जंगल परिसरात आग लागून वणवा भडकल्याने मौल्यवान वनस्पती व वन्यजीवांना धोका निर्माण झाला आहे. संबंधित विभागाने योग्यवेळी उपाययोजना कराव्या, अशी मागणी होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
एटापल्ली : तालुक्यातील येलचिलच्या जंगल परिसरात आग लागून वणवा भडकल्याने मौल्यवान वनस्पती व वन्यजीवांना धोका निर्माण झाला आहे. संबंधित विभागाने योग्यवेळी उपाययोजना कराव्या, अशी मागणी होत आहे.
एटापल्ली-आलापल्ली या ३० किमी मार्गावर घनदाट जंगल आहे. दोन्ही बाजूंनी जंगलाचा वेढा आहे. या जंगलात लहान, मोठ्या पहाडी असल्याने एकदा लागलेला वणवा वेळीच नियंत्रणात आणणे कठीण असते. विशेष म्हणजे या मार्गावरील तोंदेल ते येलचिलपर्यंत मोठमोठ्या पहाडी आहेत. गुरूवार २८ मार्चला रात्रीच्या सुमारास जंगलाला मोठ्या प्रमाणावर आग लागली. या आगीमुळे मौल्यवान लहान वनस्पती जळून खाक झाली. या जंगलात विविध जातींच्या प्राण्यांचाही वावर आहे. वणव्यामुळे वन्यप्राण्यांच्या जीवितास धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेष म्हणजे सदर भाग अतिसंवेदनशील असल्याने वेळीच उपाययोजना शक्य नाही. त्यामुळे खबदारीची आवश्यकता आहे.