यावर्षी धान खरेदीसाठी जिल्हाभरात 113 केंद्रे सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2021 05:00 AM2021-12-15T05:00:00+5:302021-12-15T05:00:29+5:30
धान खरेदीचा कालावधी खरीप पणन हंगामासाठी १ ऑक्टोबर २०२१ ते ३१ जानेवारी २०२२ पर्यंत तसेच रब्बी / उन्हाळी हंगाम १ मे ते ३० जून २०२२ असा राहणार आहे. धान विक्रीकरिता शेतकऱ्यांनी त्यांच्या केंद्रावर ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे. वनहक्क धारणाधिकार असलेल्या शेतकऱ्यांची ३१ डिसेंबरपर्यंत पोर्टलवर नोंदणी करण्यात येणार आहे. धान उत्पादक शेतकऱ्यांनी कोणत्याही खासगी व्यापारी / दलाल / मध्यस्थांची मदत न घेता थेट शासकीय खरेदी केंद्रावर धानाची विक्री करावी.
लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्ह्यातील सर्व धान उत्पादक शेतकऱ्यांना त्यांचा खरीप हंगामातील धान, शासकीय आधारभूत किमतीनुसार विक्री करण्यासाठी, जिल्हाभरात ११३ खरेदी केंद्रांना जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिली असून, त्यातील अनेक केंद्रांवर खरेदी सुरू झाली आहे. त्यात बिगरआदिवासी क्षेत्रात महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन यांच्यामार्फत १८ केंद्रे, तर उर्वरित ९५ केंद्रे आदिवासी विकास महामंडळामार्फत चालविली जात आहेत. त्यांतील ५६ केंद्रे प्रादेशिक व्यवस्थापक गडचिरोली तर ३९ केंद्रे अहेरी यांच्यामार्फत चालविली जाणार आहेत.
धान खरेदीचा कालावधी खरीप पणन हंगामासाठी १ ऑक्टोबर २०२१ ते ३१ जानेवारी २०२२ पर्यंत तसेच रब्बी / उन्हाळी हंगाम १ मे ते ३० जून २०२२ असा राहणार आहे. धान विक्रीकरिता शेतकऱ्यांनी त्यांच्या केंद्रावर ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे. वनहक्क धारणाधिकार असलेल्या शेतकऱ्यांची ३१ डिसेंबरपर्यंत पोर्टलवर नोंदणी करण्यात येणार आहे. धान उत्पादक शेतकऱ्यांनी कोणत्याही खासगी व्यापारी / दलाल / मध्यस्थांची मदत न घेता थेट शासकीय खरेदी केंद्रावर धानाची विक्री करावी. धान उत्पादकांनी खासगी व्यापाऱ्यांना खुल्या बाजारदराने धानाची विक्री केली असल्यास त्यांना चालू वर्षाचा नमुना सातबारा व बँक खात्यांचा तपशील देणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी संजय मिना यांनी शेतकऱ्यांना उद्देशून केले आहे.
टीडीसीचे उत्तर भागातील खरेदी केंद्र
- कोरची तालुका- कोरची, मसेली, बेतकाठी, मर्केकसा, कोटगुल, बेडगाव, चर्वीदंड, बोरी, कोटरा.
- कुरखेडा तालुका- रामगड, येंगलखेडा, मालेवाडा, कुरखेडा, कढोली, आंधळी, पलसगड, गोठणगाव, गेवर्धा, देऊळगाव, सोनसरी, खरकाडा, नान्ही, उराडी, अंगारा.
- आरमोरी तालुका - देलनवाडी, दवेडी, कुरुंडीमाल
- देसाईगंज तालुका - पिंपळगाव
- गडचिरोली तालुका - मौशीखांब, पोटेगाव, चांदाळा
- धानोरा तालुका - धानोरा, मुरुमगाव, रांगी, दुधमाळा, कारवाफा, मोहगाव, मोहली, सोडे, चातगाव, गट्टा, येरकड, सावरगाव, सुरसुंडी,
- चामोर्शी तालुका- घोट, मक्केपल्ली, गुंडापल्ली, भाडभिडी, सोनापूर, आमगाव, मार्केडा, पावीमुरांडा, रेगडी, गिलगाव
टीडीसीचे दक्षिण भागातील खरेदी केंद्र
- अहेरी तालुका - अहेरी, बोरी, कमलापूर, वेलगुर, इंदाराम
- सिरोंचा तालुका- असरअल्ली, अमरादी, अंकिसा, वडधम, जाफ्राबाद
- एटापल्ली तालुका - एटापल्ली, गट्टा, तोडसा, घोटसूर
- अहेरी तालुका - उमापूर, आलापल्ली, पेरमिल्ली, जिमलगट्टा, देचलीपेठा
- मुलेचरा - लगाम, मुलचेरा
- सिरोंचा - सिरोंचा, झिंगानूर, रोमपल्ली, बामणी, विठ्ठलरावपेठा, पेंटीपाका
- भामरागड - भामरागड, लाहेरी, ताडगाव, कोठी, मन्नेराजाराम
- एटापल्ली - कसनसूर, जारावंडी, गेदा, कोठमी, हालेवारा, उडेरा (बुर्गी), हेडरी
- तर दाखल होणार फौजदारी गुन्हा
आधारभूत योजनेंतर्गत धान खरेदीचे दर हे ‘अ’ दर्जाच्या धानाकरिता प्रतिक्विंटल १९६० रुपये तर साधारण धानाकरिता प्रतिक्विंटल १९४० रुपये राहणार आहेत. धान उत्पादक शेतकऱ्यांव्यतिरिक्त व्यापारी किंवा इतर कोणत्याही व्यक्तीने संबंधित केंद्रावर धान विक्री करण्यासाठी आणल्याचे निदर्शनास आल्यावर त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. जिल्हा कृषी अधीक्षक यांचा सन २०२१-२२ मधील पीक कापणी प्रयोग पूर्ण झालेला नाही. सद्य:स्थितीत प्रतिहेक्टरी २४.०३ क्विंटल धान उत्पादकता ठरवून दिलेली आहे. पीककापणी प्रयोग अहवाल पूर्ण झाल्यानंतर त्यात बदल (कमी/जास्त) होण्याची शक्यता आहे.