यावर्षी खरीप पिकांची स्थिती समाधानकारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2018 10:49 PM2018-10-01T22:49:39+5:302018-10-01T22:50:00+5:30

मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी पिकांची स्थिती समाधानकारक असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाने जाहीर केलेल्या हंगामी पैसेवारीवरून दिसून येते. मागील वर्षी खरीपाची हंगामी पैसेवारी ६५ पैसे एवढी होती. यावर्षीच्या ही पैसेवारी ७१ एवढी आहे. कीडीचा प्रादुर्भाव न झाल्यास पीक चांगले येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

This year, the condition of kharif crops is satisfactory | यावर्षी खरीप पिकांची स्थिती समाधानकारक

यावर्षी खरीप पिकांची स्थिती समाधानकारक

Next
ठळक मुद्देहंगामी पैसेवारी ७१ : कृषी व महसूल विभागाच्या पाहणीत गेल्यावर्षीपेक्षा स्थितीत सुधारणा

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी पिकांची स्थिती समाधानकारक असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाने जाहीर केलेल्या हंगामी पैसेवारीवरून दिसून येते. मागील वर्षी खरीपाची हंगामी पैसेवारी ६५ पैसे एवढी होती. यावर्षीच्या ही पैसेवारी ७१ एवढी आहे. कीडीचा प्रादुर्भाव न झाल्यास पीक चांगले येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
जिल्ह्यात एकूण पीक लागवडीच्या सुमारे ९० टक्के क्षेत्रावर धान पिकाची लागवड केली जाते. धान हे जिल्ह्यातील प्रमुख पीक आहे. यावर्षी सुरूवातीपासून अगदी वेळेवर पाऊस झाला. त्यामुळे धान पिकाचे पऱ्हे टाकणीसह रोवणी व इतर कामे अगदी वेळेवर झाली. त्यामुळे धानाची स्थिती मागील वर्षीच्या तुलनेत चांगली आहे.
पावसाने उसंत घेतल्याने तलाव, बोड्याचे पाणी दिले जात आहे. हलके धान पीक निघले असून मध्यम व धानपीक निघण्याच्या मार्गावर आहे. धान पिकाची स्थिती चांगली आहे. मात्र सतत पडणाऱ्या पावसामुळे कापूस, सोयाबिन, तूर या पिकांची स्थिती मात्र फारशी चांगली नाही. पावसामुळे या पिकांची वाढ करपली होती. आता पावसाने उसंत घेतल्याने कापसाला बोंड येण्याच्या मार्गावर असताना कापूस करपत आहे.
गडचिरोली जिल्ह्यात एकूण १ हजार ६८८ गावे आहेत. त्यापैकी १ हजार ५३९ गावांमध्ये खरीप पिकांची लागवड करण्यात आली. सुमारे १ लाख ७६ हजार ९९९ हेक्टरवर खरीप पिकांची लागवड झाली आहे. सप्टेंबर महिन्यात पीक परिरिस्थतीचा आढावा घेतला जातो. याला हंगामी पैसेवारी संबोधल्या जाते. या पैसेवारीवरून जिल्हाभरातील पिकांची स्थिती कळून येण्यास मदत होते. कृषी विभाग व महसूल विभागाने केलेल्या पाहणीमध्ये यावर्षी पिकांची स्थिती थोडी चांगली असल्याचे आढळून आले आहे.
जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांची पैसेवारी ५० पैसेपेक्षा अधिक आहे. ५० पैसेपेक्षा कमी पैसेवारी असलेले जिल्हाभरात एकही गाव आढळले नाही. मागील वर्षी १५ गावांची पैसेवारी ५० पेक्षा कमी आढळली होती.
धानपीक निघण्याच्या मार्गावर असताना मावा व तुडतुडा रोगाने हल्ला केला. त्यामुळे काही शेतकºयांचे पीक उद्ध्वस्त झाले. परिणामी १६६ अंतिम पैसेवारी ५० पेक्षा कमी आढळली. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी पिकांची स्थिती चांगली असल्याचे दिसून येते.
६२ गावांमध्ये पिकांची लागवडच नाही
गडचिरोली जिल्ह्यात एकूण १ हजार ६८८ गावे आहेत. यापैकी ६२ गावांमध्ये खरीप पिकाची लागवड केली जात नाही. यामध्ये गडचिरोली तालुक्यातील १ गाव, धानोरा तालुक्यातील ६ गावे, चामोर्शी तालुक्यातील ६ गावे, आरमोरी १, कुरखेडा ५, कोरची व अहेरी प्रत्येकी ६, एटापल्ली ३, भामरागड तालुक्यातील २२ व सिरोंचा तालुक्यातील ६ गावांमध्ये खरीप पिकांची लागवड करण्यात आली नाही. भामरागड तालुक्यातील काही गावांची लोकसंख्या अतिशय कमी आहे. या भागात सिंचनाची सुविधा उपलब्ध नाही. त्याचबरोबर गावाच्या सभोवताल वन विभागाची जमीन असल्याने शेती करणे शक्य नाही. परिणामी भामरागड तालुक्यातील सर्वाधिक २२ गावांमध्ये खरीपाचे तसेच रबीेचे सुध्दा कोणतेच उत्पादन घेतले जात नाही. भामरागड तालुक्यातील जे शेतकरी खरीप पिकांची लागवड करतात, त्यासाठी सुध्दा अतिशय जुनाट पध्दती अवलंबिली जाते. परिणामी इतर तालुक्यांच्या तुलनेत या तालुक्यातील दर हेक्टरी उत्पादन कमी असल्याचे दिसून येते.

Web Title: This year, the condition of kharif crops is satisfactory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.