याहीवर्षी नागपंचमीला अवतरले नागराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2019 11:10 PM2019-08-05T23:10:24+5:302019-08-05T23:10:54+5:30

नागपंचमी हा नागदेवतांचा सण म्हणून ओळखला जातो. नागपंचमीच्या निमित्ताने सोमवारला अनेक भाविकांनी नागमंदिर व शिवमंदिरात जाऊन नागदेवतेच्या मुर्तीची पूजा-अर्चा केली. परंतु आरमोरी तालुक्याच्या पळसगाव येथील महादेव पहाडीवर असलेल्या मंदिरात भाविकांना नागपंचमीच्या दिवशीच खऱ्याखुºया नागोबाचे दर्शन झाले. आरमोरी तालुका मुख्यालयापासून जवळच असलेल्या कासवीलगतच्या पळसगाव येथील महादेवगड पहाडीवर शिवमंदिर आहे.

This year, Nagaraj descended on Nagpanchami | याहीवर्षी नागपंचमीला अवतरले नागराज

याहीवर्षी नागपंचमीला अवतरले नागराज

Next
ठळक मुद्देभाविकांची प्रचंड गर्दी : पळसगावच्या पहाडीवरील मंदिरातील दुर्मिळ योग

लोकमत न्यूज नेटवर्क
जोगीसाखरा : नागपंचमी हा नागदेवतांचा सण म्हणून ओळखला जातो. नागपंचमीच्या निमित्ताने सोमवारला अनेक भाविकांनी नागमंदिर व शिवमंदिरात जाऊन नागदेवतेच्या मुर्तीची पूजा-अर्चा केली. परंतु आरमोरी तालुक्याच्या पळसगाव येथील महादेव पहाडीवर असलेल्या मंदिरात भाविकांना नागपंचमीच्या दिवशीच खऱ्याखुºया नागोबाचे दर्शन झाले.
आरमोरी तालुका मुख्यालयापासून जवळच असलेल्या कासवीलगतच्या पळसगाव येथील महादेवगड पहाडीवर शिवमंदिर आहे. नागपंचमीच्या दिवशी सोमवारला पळसगाव, कासवी, उसेगाव, अरततोंडी, फरीझरी, मोहटोला, किन्हाळा, डोंगरगाव, चिखली रिठ, जोगीसाखरा, कोकडी, विहिरगाव, पोटगाव, आष्टा, पाथरगोटा, रामपूर तसेच आरमोरी आणि देसाईगंज तालुक्यातील काही भाविक पूजा करण्यासाठी या शिव मंदिरात आले. दरम्यान भगवान शंकराच्या पिंडीवर भाविकांना खºयाखुºया सापांचे दर्शन घडले. पिंडीवर साप असल्याची माहिती वाºयासारखी पसरली आणि भाविकांनी एकच गर्दी केली.
येथे पुरातन काळापासून महादेवाचे मंदिर आहे. सदर पहाडीवरील पिंडीवर दरवर्षी श्रावण महिन्यात पुराण कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. यावर्षी सुध्दा पुराणाच्या कार्यक्रमाला सुरूवात झाली आहे. येथे रात्रीच्या सुमारास पुराण वाचण्याचे काम दोनाडकर महाराज यांच्या हस्ते करण्यात येते. यासाठी अनेकजण सहकार्य करतात.

Web Title: This year, Nagaraj descended on Nagpanchami

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.