यंदा ओबीसी विद्यार्थ्यांनाही गणवेश मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2020 05:00 AM2020-06-24T05:00:00+5:302020-06-24T05:00:46+5:30
सोमवारी ओबीसी महासंघाच्या पदाधिकाºयांनी जि.प.कार्यालय गाठून पदाधिकाºयांची भेट घेतली. त्यांच्यापुढे ओबीसी विद्यार्थ्यांच्या गणवेशाची समस्या मांडली. समग्र शिक्षा अभियानांतर्गत जि.प.शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीच्या सर्व विद्यार्थिनी तसेच एससी, एसटी, एनटी/व्हीजे तसेच बीपीएल कुटुंबातील विद्यार्थ्यांनाच जि.प.प्रशासनामार्फत दोन गणवेश मोफत दिले जातात
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : यावर्षीच्या शैक्षणिक सत्रात समग्र शिक्षा अभियानांतर्गत जि.प. शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या ओबीसी व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांनाही गणवेश देण्याची मागणी ओबीसी महासंघाच्या शिष्टमंडळाने जि.प. पदाधिकाऱ्यांकडे केली. त्यावर ओबीसी विद्यार्थ्यांनाही गणवेश देण्याचे नियोजन केले जाणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या वतीने अध्यक्ष अजय कंकडालवार व उपाध्यक्ष तथा शिक्षण सभापती मनोहर पोरेटी यांनी शिष्टमंडळाला दिली.
सोमवारी ओबीसी महासंघाच्या पदाधिकाºयांनी जि.प.कार्यालय गाठून पदाधिकाºयांची भेट घेतली. त्यांच्यापुढे ओबीसी विद्यार्थ्यांच्या गणवेशाची समस्या मांडली. समग्र शिक्षा अभियानांतर्गत जि.प.शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीच्या सर्व विद्यार्थिनी तसेच एससी, एसटी, एनटी/व्हीजे तसेच बीपीएल कुटुंबातील विद्यार्थ्यांनाच जि.प.प्रशासनामार्फत दोन गणवेश मोफत दिले जातात. मात्र जि.प.शाळांमध्ये शिकणारे ओबीसी व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थी गणवेश योजनेपासून वंचित राहतात. एका बाकावर बसणाºया विविध प्रवर्गातील विद्यार्थ्यांमध्ये गणवेशामुळे विषमता निर्माण होऊ शकते. न्यूनगंडता टाळण्यासाठी इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या ओबीसी व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना सुद्धा गणवेश देण्यात यावा, अशी मागणी ओबीसी महासंघाच्या पदाधिकाºयांनी केली. यावर सकारात्मक आश्वासन देत ओबीसी व खुल्या प्रवर्गातील सर्व विद्यार्थ्यांना यंदाच्या सत्रात शालेय गणवेश उपलब्ध करून देऊ, असे अध्यक्षांनी सांगितले.
शिष्टमंडळाच्या वतीने यावेळी निवेदन देऊन चर्चा करण्यात आली. यावेळी महासंघाचे राष्टÑीय उपाध्यक्ष प्रा.शेषराव येलेकर, जि.प.चे माजी उपाध्यक्ष जीवन नाट, जि.प.सदस्य विनोद लेनगुरे, संजय चरडुके, ओबीसी महासंघाचे जिल्हाध्यक्ष दादाजी चुधरी, सचिव प्रा.देवानंद कामडी, कार्याध्यक्ष विनायक बांदुरकर आदी उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे की, जि.प.शाळांमध्ये बहुतांश गरीब कुटुंबातील विद्यार्थी शिक्षण घेत असतात. यामध्ये सर्व समाजातील व घटकातील विद्यार्थ्यांचा समावेश असतो. यंदा कोरोनामुळे सर्वसामान्य पालकांवर आर्थिक संकट कोसळले आहे. त्यामुळे गणवेशाचा प्रश्न सोडण्याची मागणी केली आहे.
निधीची अडचण, तरीही सोय करू
यावर्षी कोरोनाच्या संकटामुळे जिल्हा परिषदेला प्राप्त होणाºया अनुदानामध्ये कपात होण्याची शक्यता आहे. असे जरी असले तरी विद्यार्थ्यांना व शिक्षणाला प्राथमिकता देऊन ओबीसी व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना कोणत्याही परिस्थितीत गणवेश देऊ, असे ठोस आश्वासन पदाधिकाºयांनी दिले.