अभ्यासविना गेले गरीब विद्यार्थ्यांचे वर्ष, यावर्षीही परिस्थिती तशीच !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2021 05:00 AM2021-06-12T05:00:00+5:302021-06-12T05:00:18+5:30
आरटीई अंतर्गत खासगी, विनाअनुदानित इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये २५ टक्के जागा वंचित व दुर्बल घटकातील मुला, मुलींसाठी राखीव असतात. शासनाच्या या याेजनेतून गेल्या सात-आठ वर्षांपासून जिल्ह्यातील हजाराे गरीब विद्यार्थी इंग्रजी माध्यमांच्या खासगी शाळांमध्ये शिक्षण घेत आहेत. प्रवेश व शिक्षण शुल्काची प्रतिपूर्ती संबंधित शाळांना शासनाकडून केली जाते.
लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : बालकांचा माेफत सक्तीच्या शिक्षणाच्या अधिकार, अधिनियमाअंतर्गत दुर्बल व वंचित घटकातील पाल्यांना इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये माेफत प्रवेश दिला जाताे. गतवर्षी सन २०२०-२१ या सत्रात शेकडाे विद्यार्थ्यांना माेफत प्रवेश मिळाला. मात्र काेराेना महामारीच्या संकटामुळे गतवर्षी या याेजनेतून प्रवेश झालेल्या व शिकत असलेल्या विद्यार्थ्यांचे वर्ष अभ्यासाविना गेले.
आरटीई अंतर्गत खासगी, विनाअनुदानित इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये २५ टक्के जागा वंचित व दुर्बल घटकातील मुला, मुलींसाठी राखीव असतात. शासनाच्या या याेजनेतून गेल्या सात-आठ वर्षांपासून जिल्ह्यातील हजाराे गरीब विद्यार्थी इंग्रजी माध्यमांच्या खासगी शाळांमध्ये शिक्षण घेत आहेत. प्रवेश व शिक्षण शुल्काची प्रतिपूर्ती संबंधित शाळांना शासनाकडून केली जाते.
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागामार्फत तसेच बाराही पंचायत समितीस्तरावरील गटसाधन केंद्राच्या माध्यमातून आरटीई प्रवेश प्रक्रियेची अंमलबजावणी केली जात आहे. अनलाॅकनंतर आता प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.
विद्यार्थ्यांना साधने पुरविणे आवश्यक
आरटीईअंतर्गत प्रवेश घेऊन शिकत असलेले मुले व मुली सामान्य कुटुंबातील आहेत. काेराेना संकटामुळे गेल्या वर्षभर शाळा सुरू झाल्या नाही. अनेकांच्या पालकांकडे स्मार्ट फाेनही उपलब्ध नाही. अशा विद्यार्थ्यांना शिक्षण विभागाने स्मार्ट फाेन व इतर साहित्य पुरविणे गरजेचे आहे.
शहरी भागातील काही पालकांकडे स्मार्ट फाेन आहेत. मात्र ग्रामीण भागातील पालकांकडे स्मार्ट फाेन नाहीत. शिवाय अभ्यासाचे विविध साहित्यही उपलब्ध हाेत नाही. याबाबत शिक्षण विभागाने पुढाकार घेणे आवश्यक आहे.
शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत २५ टक्के माेफत प्रवेश याेजनेची अंमलबजावणी केली जात आहे. या याेजनेतून प्रवेश घेऊन शिक्षण घेत असलेले विद्यार्थी सर्वसामान्य व गरीब कुटुंबातील आहेत. काेराेना लाॅकडाऊनमुळे हे विद्यार्थी प्रत्यक्ष शाळेत जाऊन गतवर्षी शिक्षण घेऊ शकले नाही. ऑनलाईन स्वरूपात शिक्षक व पालकांच्या सहकार्याने काही विद्यार्थ्यांनी शिक्षण घेण्याचा प्रयत्न केला. यंदा आतापर्यंत ४९४ विद्यार्थ्यांची माेफत प्रवेशासाठी निवड झाली आहे.
- हेमलता परसा, प्राथमिक शिक्षणाधिकारी
गेले वर्ष वाया गेले !
माझ्या मुलाचा गतवर्षीच्या शैक्षणिक सत्रात आरटीई अंतर्गत शाळेत इयत्ता पहिलीत प्रवेश झाला. मात्र काेराेना महामारीच्या संकटामुळे चवथीपर्यंतच्या शाळा प्रत्यक्ष भरल्या नाही. वर्षभर प्रत्यक्ष वर्ग सुरू न झाल्याने माझ्या मुलाने शाळा बघितली नाही. घरीच राहुन आम्ही त्याच्याकडून थाेडाफार अभ्यास करून घेतला.
- प्रेमिला मेश्राम, पालक
काेराेना महामारीमुळे खालच्या वर्गातील विद्यार्थ्यांचे माेठे शैक्षणिक नुकसान झाले. इयत्ता पहिली ते चवथीपर्यंच्या विद्यार्थ्यांना माेबाइलच्या साहाय्याने ऑनलाईन शिक्षण देणे फारसे प्रभावी ठरत नाही. माझा मुलगा आरटीअंतर्गत गतवर्षी चवथीला हाेता. त्याने घरीच राहून शिक्षण घेण्याचा प्रयत्न केला. अनेकदा अडचणी येत हाेत्या.
- विनाेद भैसारे, पालक
आरटीई २५ टक्के प्रवेशाची याेजना सामान्य पालकांसाठी दिलासा देणारी ठरली आहे. आर्थिक ऐपत नसताना चांगल्या शाळेत शिक्षण घेण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळत आहे. काेराेना लाॅकडाऊनमुळे वर्षभर विद्यार्थी घरी राहिले. त्यांच्या गुणवत्तेवर परिणाम झाला. लाॅकडाऊनमुळे माझ्या पाल्यांसह अनेकांचे नुकसान झाले.
- कैलास म्हशाखेत्री