वर्ष उलटले, मात्र मच्छीमारांना नुकसानभरपाई मिळेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:35 AM2021-05-17T04:35:06+5:302021-05-17T04:35:06+5:30
मागील वर्षी २५ मार्चपासून ३१ दिवसांचा व त्यानंतर दोन महिन्यांचा लाॅकडाऊन हाेता. यामुळे मत्स्य व्यवसायाशी निगडित मच्छीमार संस्थांचे नुकसान ...
मागील वर्षी २५ मार्चपासून ३१ दिवसांचा व त्यानंतर दोन महिन्यांचा लाॅकडाऊन हाेता. यामुळे मत्स्य व्यवसायाशी निगडित मच्छीमार संस्थांचे नुकसान झाले. संबंधित संस्था सभासदांना धान्य उत्पादकाप्रमाणे नुकसानभरपाई देण्याचे विभागीय आयुक्त मत्स्य व्यवसाय विभागाने जाहीर केले हाेते. यासंदर्भात ३१ मार्च २०२० राेजी साहाय्यक निबंधक सहकारी संस्था (दुग्ध) गडचिरोली यांच्यामार्फत जिल्ह्यातील ८६ संस्थांना पत्रही पाठविण्यात आले. सदर पत्रात मत्स्य संस्थांच्या सक्रिय सभासदांचे पूर्ण नाव, आधार कार्ड व बँक खाते तत्काळ मागून संबंधित सभासदांच्या खात्यात आर्थिक मदत देण्याचे जाहीर केले होते. परंतु वर्ष उलटूनही मच्छीमार बांधवांना कोणतीही नुकसानभरपाई मिळालेली नाही.
बाॅक्स
धान उत्पादकांप्रमाणे भरपाई द्या
मागील वर्षीपासून काेराेना विषाणूचा संसर्ग पसरत आहे. संसर्गामुळे मच्छीपालन संस्थांची मासेमारी थांबली. सध्या जलसाठा कमी झाल्याने मत्स्यबीज तलाव आटून बीज मृत्युमुखी पडले आहेत. शासन ज्याप्रमाणे शेतकऱ्यांना पिकांची नुकसानभरपाई देते, त्याप्रमाणे शासनाने ठरविल्याप्रमाणे धान उत्पादकांप्रमाणे नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी वैरागड मच्छीपालन संस्थेचे अध्यक्ष रोहिदास दुमाने, सदस्य कुंडलिक धनकर, विनोद कांबळे, कमला मेश्राम, विजय जराते खुशाल पंडेलगोत, मुन्ना मानकर, गोमाजी भोयर व संस्थेचे सचिव गजानन धनकर यांनी केली आहे.
===Photopath===
160521\16gad_6_16052021_30.jpg
===Caption===
नुकसान भरपाईबाबत शासनाने संस्थाना दिलेले पत्र दाखविताना पदाधिकारी.