विद्यापीठातील विविध घडामाेडीने गाजले वर्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 04:28 AM2020-12-26T04:28:58+5:302020-12-26T04:28:58+5:30

चुकीच्या आरक्षण पध्दतीमुळे गाेंडवाना विद्यापीठातील प्राध्यापकांच्या ३५ पदांची प्रक्रियेवर आक्षेप नाेंदविण्यात आला. ही पदभरती प्रक्रिया याच वर्षात न्याय प्रविष्ट ...

The year was marked by various developments in the university | विद्यापीठातील विविध घडामाेडीने गाजले वर्ष

विद्यापीठातील विविध घडामाेडीने गाजले वर्ष

Next

चुकीच्या आरक्षण पध्दतीमुळे गाेंडवाना विद्यापीठातील प्राध्यापकांच्या ३५ पदांची प्रक्रियेवर आक्षेप नाेंदविण्यात आला. ही पदभरती प्रक्रिया याच वर्षात न्याय प्रविष्ट झाली.

बाॅक्स

मावळत्या कुलगुरूच्या निराेपाला कर्मचाऱ्यांची दांडी

विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ. एन. व्ही. कल्याणकर यांचा कार्यकाळ संपल्याने ८ सप्टेंबर २०२० राेजी त्यांना निराेप देण्यात आला. त्याच दिवशी प्रभारी कुलगुरू म्हणून नियुक्ती झालेले प्रा. डाॅ. श्रीनिवास वरखेडी यांनी आपल्या पदाची सुत्रे हाती घेतली. दरम्यान मावळत्या कुलगुरूंच्या निराेप समारंभाला विद्यापीठातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दांडी मारली.

अनुभवी कुलसचिव उणीव

विद्यापीठाच्या विविध पदावर यशस्वीरित्या काम केलेल्या डाॅ. ईश्वर माेहुर्ले यांनी दाेन वर्ष कुलसचिव पदाच्या पदाला न्याय दिला. पाच वर्षासाठी त्यांची कुलसचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली हाेती. मात्र ते यापूर्वी कार्यरत असलेल्या संस्थेने धारणाधिकार विस्तारीत न केल्यामुळे डाॅ. माेहुर्ले यांना कुलसचिव पद साेडावे लागले. अनुभवी कुलसचिवाची उणीव २०२० वर्षाच्या अखेरीसपासून जाणवत आहे.

Web Title: The year was marked by various developments in the university

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.